मुंबई : कॉर्पोरेट बाँडमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (EPFO) हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने (HDFC) जारी केलेल्या दहा हजार कोटी रुपयांच्या रोख्यांपैकी 65 टक्के रोखे विकत घेतले. यानंतर एसबीआय पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंडाचा क्रमांक लागत असल्याची माहिती या संबंधित तज्ज्ञांनी दिली आहे. 2018 च्या अखेरीस इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (IL&FS ) च्या दिवाळखोरी नंतर ईपीएफओने प्रथमच कोणत्याही खासगी संस्थेने जारी केलेल्या रोख्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. एचडीएफसीने वार्षिक 7.18 टक्के कूपन दराने 10 वर्षांत परिपक्व होणाऱ्या नॉन-कन्व्हर्टिव्ह डिबेंचर्स जारी करून 10,000 कोटी रुपये उभे केले आहेत.
फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बाँडवर सेट केलेले कूपन नवीन 10 वर्षांच्या बेंचमार्क बाँड वार्षिक उत्पन्नापेक्षा केवळ 17 बेसिस पॉईंट्स जास्त आहेत आणि समान परिपक्वता असलेल्या राज्य कर्जांपेक्षा 6 बेसिस पॉईंट्स कमी आहेत. ब्रोकरेज फर्मच्या एका डीलरने सांगितले की, ईपीएफओची मागणी लक्षात घेता, एए आणि त्यापेक्षा जास्त रेटिंग असलेले इतर सादरकर्ते गुंतवणूकदारांच्या मोठ्या वर्गाकडून चांगले दर आणि मजबूत मागणीचा फायदा घेण्यासाठी बाजारात स्पर्धा निर्माण करू शकतात.
ईपीएफओने खासगी कंपन्यांनी जारी केलेल्या रोख्यांमध्ये केलेली गुंतवणूक बंद केली आहे. परंतु सरकारी कंपन्या रोख्यांमध्ये सक्रिय गुंतवणूकदार राहतात. याचे कारण असे की आयएल अँड एफएस आणि ग्रुप कंपन्या दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन आणि रिलायन्स कॅपिटल यांनी त्यांच्या कर्जाच्या साधनांवरील चुकीमुळे बाजारात त्यांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागले होते.
परंतु, एचडीएफसीमधील नुकत्याच झालेल्या गुंतवणूकीनंतर हे चित्र पालटले आहे. सरकारी सिक्युरिटीजमध्ये पुरवठ्याची कमतरता
आणि कॉर्पोरेट बाँडमध्ये सरकारी मालकीच्या संस्थांमध्ये ते अधिक गुंतवणूकीच्या संधी शोधत असल्याने हा कल बदलत असल्याचे दिसून येत आहे.
डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात निधी उभारणी केल्यानंतर ही होम फायनान्स कंपनी वर्षअखेरीस बाजारात येण्याची शक्यता कमी आहे. बाजारातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एचडीएफसीने गेल्या तीन महिन्यांत 14,500 कोटी रुपये जमा केले, त्यापैकी एक मोठा हिस्सा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील होता.
नॉन-कंवर्टिवल डिबेंचर्स सरकार किंवा कंपनीद्वारे जारी केले जातात. मोठी कॉर्पोरेट घराणी थेट लोकांकडून कर्ज घेतात. त्या बदल्यात कंपनी गुंतवणुकदारांना टोकन देते, ज्यात तुमच्या पैशावर व्याज दर लिहिला जातो. जेव्हा तुम्ही एनसीडीमध्ये पैसे ठेवता तेव्हा गुंतवणूकदार थेट एखाद्या कंपनीला किंवा मोठ्या संस्थेला पैसे उधार देतो. यामध्ये सर्वाधिक फायदा ग्राहकांना होतो. त्याला एफडीमध्ये मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त व्याज मिळते.
या आठवड्यात जनतेवर फुटणार दरवाढीचा बॉम्ब, पेट्रोल-डिझेलच्या किंमती 15 रुपयांनी वाढण्याची शक्यता
म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा काय आहे पर्याय? SIP की एक रक्कमी गुंतवणूक फायद्याची
Fuel : कच्च्या तेलाचा आगडोंब, भाव 130 डॉलरच्या उंबरठ्यावर! पेट्रोल सव्वाशेपार जाणार?