RTGS आणि NEFTद्वारे पैसे ट्रान्सफर करताय? मग या 8 गोष्टी माहीतच हव्यात!

| Updated on: Jan 16, 2021 | 3:56 PM

RTGS आणि NEFTद्वारे ग्राहकांना घर बसल्या बँकिंगची कामे करता येत आहेत. ( faqs related to rtgs and neft one should know about)

RTGS आणि NEFTद्वारे पैसे ट्रान्सफर करताय? मग या 8 गोष्टी माहीतच हव्यात!
Follow us on

मुंबई: RTGS आणि NEFTद्वारे ग्राहकांना घर बसल्या बँकिंगची कामे करता येत आहेत. RTGS आणि NEFT द्वारे इंटर बँक ट्रान्सफर करता येते. या बँकिंग सुविधेद्वारे कोणत्याही गरजवंतला कुठेही बसून तात्काळ पैसे पाठवता येतात. त्यामुळे आजच्या काळात RTGS आणि NEFTशी संबंधित 8 गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्यात. या सेवेचा लाभ घेताना ग्राहकांच्या मनात काही प्रश्न निर्माण होतात, त्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप… ( faqs related to rtgs and neft one should know about)

RTGS आणि NEFT म्हणजे काय?

RTGS अर्थात Real Time Gross Settlement द्वारे एखाद्या व्यक्तीला तात्काळ पैसे पाठवता येतात. रिअल टाईम बेसिसवर हा निधी ट्रान्सफर केला जातो. RTGS आजच्या घडीला इंटर बँकिंग मनी ट्रान्सफरचा सर्वात वेगवान पर्याय आहे. तर, NEFT अर्थात National Electronic Fund Transfer ही निधी ट्रान्सफर करण्याची आरटीजीएसपेक्षा वेगळी पद्धती आहे. NEFT वरून पैसे पाठवताना अर्धा तास लागतो. यात निधी ट्रान्सफर करण्याची रोज 48 तासाची बॅच असते.

किती रक्कम ट्रान्सफर करू शकता?

RTGS द्वारे कमीत कमी दोन लाख आणि जास्तीत जास्त 10 लाख रुपये ट्रान्सफर केली जाते. तर NEFTद्वारे पैसे पाठवण्याची कोणतीही किमान मर्यादा नाही. मात्र, 10 लाखांच्यावर रक्कम ट्रान्फर करता येत नाही.

RTGSद्वारे किती वेळात रक्कम मिळते

RTGSद्वारे कोणत्याही खातेधारकाला तात्काळ पैसा ट्रान्सफर होतो. लाभार्थ्याचं अकाउंट ज्या बँकेत आहे, त्याला निधी मिळाल्यानंतर दोन तासाच्या आत क्रेडिटचा मेसेज पाठवावा लागतो.

NEFTद्वारे किती वेळात रक्कम मिळते

कोणत्याही लाभार्थ्याला NEFTद्वारे त्याच दिवशी पैसे ट्रान्फर होतात. NEFTमध्ये अर्ध्या तासाचा स्लॉट असतो. अर्धा तासाच्या अंतराने याची सिस्टीम चालते.

RTGSद्वारे लाभार्थ्याला पैसे मिळाले नाही तर

RTGS द्वारे पैसे पाठवूनही ते पैसे लाभार्थ्याच्या खात्यात आले नाही तर ज्या व्यक्तिने पैसे ट्रान्सफर केले त्याच्या खात्यात त्याचे पैसे दोन तासात परत येतात.

NEFTद्वारे लाभार्थ्याला पैसे मिळाले नाही तर

काही कारणास्तव बँक फंड क्रेडिट करू शकले नाही तर बँक ज्या व्यक्तिने पैसे ट्रान्सफर केले त्याच्या खात्यात त्याचे पैसे दोन तासात परत येतात.

आठवड्यातून कितीवेळा RTGSचा लाभ घेता येतो

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने नियमात बदल केले आहेत. त्यानुसार आता RTGSच्या सेवेचा आता आठवडाभर 24 तास लाभ घेता येत आहे. ( faqs related to rtgs and neft one should know about)

आठवड्यातून कितीवेळा NEFTचा लाभ घेता येतो

सोमावर ते शनिवारपर्यंत तुम्ही NEFTद्वारे प्रत्येक अर्ध्या तासाने रकम ट्रान्सफर करू शकता. मात्र NEFTद्वारे सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच रक्कम ट्रान्सफर करता येते. एकदा पैसा ट्रान्सफर केल्यावर पुढचा अर्धा तास तुम्हाला कोणतीही रक्कम ट्रान्सफर करता येणार नाही. ( faqs related to rtgs and neft one should know about)

 

संबंधित बातम्या:

बँक खात्यात निगेटिव्ह बॅलन्स आहे? जाणून घ्या ‘हे’ महत्त्वाचे नियम

शेवटच्या क्षणी ITR फाईल करताय? स्टेट्स जाणून घेण्यासाठी सोप्या टिप्स

सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द; ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?

( faqs related to rtgs and neft one should know about)