PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी असलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नवीन हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट पुढे आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणार्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 18,000 कोटी रुपयांचा 15 वा हप्ता जारी करणार आहेत. ज्याचा 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे थेट जमा होतात. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. केंद्र सरकारने 27 जुलै 2023 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता जारी केला होता. या योजनेंतर्गत आतापर्यंत 14 हप्त्यांमध्ये 2.62 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11:30 वाजता खुंटी, झारखंड येथून शेतकऱ्यांना 15 वा हप्ता हस्तांतरित करतील.