मुंबई: कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून सातत्याने रेपो रेटमध्ये कपात केली जात आहे. अशातच बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर अधिक व्याजदर (Intrest Rates) मिळवून देणाऱ्या योजनाही रद्द करण्यात आल्या आहेत. 30 जूनपासून ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदराचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिक चांगला व्याजदर देणाऱ्या पर्यायी योजनांच्या शोधात आहेत. अशा नागरिकांसाठी SBI, ICICI, HDFC आणि बँक ऑफ बडोदामध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरु शकते. गेल्यावर्षी मे महिन्यात या बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना सुरु करण्यात आल्या होत्या. (Special fd schemes deadline ended on 30 june 2021)
यापैकी बँक ऑफ बडोदामध्ये 60 वर्षांपेक्षा कमी वयोगटाच्या व्यक्तींना मुदत ठेवीवर 5.25 टक्के व्याज मिळत आहे. तर 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या व्यक्तींना मुदत ठेवीवर 6.25 टक्के इतका व्याजदर मिळत आहे. इतर बँकांमध्ये मिळणाऱ्या व्याजदराच्या तुलनेत बँक ऑफ बडोदाचा मुदत ठेवीवरील व्याजदर साधारण 0.50 टक्क्यांनी अधिक आहे.
याशिवाय, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर तब्बल 0.80 टक्के अधिक व्याजदर मिळत आहे. एसबीआयमध्ये सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवीचा व्याजदर 6.20 टक्के इतका आहे. मात्र, या योजनेची मुदत येत्या 30 जूनला संपत आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवीचा व्याजदर 5.90 टक्क्यांपर्यंत खाली येईल.
एचडीएफसी बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 5 ते 10 वर्षांच्या कालावधीच्या मुदत ठेवीसाठी 6.25 टक्के इतका व्याजदर मिळत आहे. ही योजनादेखील 30 जूनपर्यंत सुरु राहणार आहे. तर 60 वर्षांपेक्षा कमी वयोगटाच्या लोकांना एचडीएफसी बँकेत मुदत ठेवीवर 5.50 टक्के व्याज मिळत आहे.
आयसीआयसीआय बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांच्या मुदत ठेवीसाठी 6.30 टक्के इतका व्याजदर दिला जात आहे. सामान्य ग्राहकांसाठी हा व्याजदर 5.50 टक्के इतका आहे.
कोरोना संकटामुळे सध्या अनेकांचा आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. अशा लोकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) विशेष कर्ज योजना जाहीर केली आहे. कवच पर्सनल लोन, असे या योजनेचे नाव आहे. या योजनेतंर्गत कोणत्याही व्यक्तीला 25 हजार ते 5 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. या योजनेमुळे कोरोनामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याचा SBI चा मानस आहे.
तुम्ही कर्ज घेतल्यानंतर ते तुम्हाला मुदतीपूर्वी फेडायचे असेल तर त्यावर कोणता दंडही लागणार नाही. कमी व्याजदरासोबत कर्ज फेडण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी स्टेट बँकेने देऊ केला आहे. तसेच कर्जदरांना तीन महिन्यांच्या मोरेटोरियमची सुविधाही देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्यांसाठी SBI कडून स्वस्त व्याजदरात कर्ज, जाणून घ्या सर्वकाही
मुंबईतील डबेवाल्यांच्या मदतीसाठी परदेशी बँकेचा पुढाकार; 15 कोटींची मदत करणार
6th Pay Commission बाबत मोठी बातमी, 1 जुलैपासून सर्व नियम लागू होणार
(Special fd schemes deadline ended on 30 june 2021)