नवी दिल्लीः आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची शेवटची तारीख आता 31 डिसेंबर 2021 आहे. प्राप्तिकर विभागाच्या नवीन वेबसाईटमध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यातून रिटर्न भरताना येणाऱ्या अडचणी पाहता सरकारने ऑडिट न केलेल्यांसाठी रिटर्न भरण्याची तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवली. यापूर्वी ITR भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. आता 31 डिसेंबरपर्यंत विवरणपत्र भरण्यासाठी 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार नाही. दंड टाळणे याचा अर्थ असा नाही की व्याजदेखील जतन केले जाणार आहे. करदात्यांना अजूनही व्याज भरावे लागेल. तुमच्याकडे कर दायित्व असल्यास व्याज टाळण्यासाठी आताच कर भरणे फायदेशीर ठरेल.
आयकर नियमांनुसार, सर्व लोकांना शेवटच्या तारखेनंतर आयटीआर भरण्यासाठी दंड भरावा लागत नाही. जर एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त नसेल तर आयटीआरच्या शेवटच्या तारखेनंतरही रिटर्न भरण्यासाठी कोणताही दंड भरावा लागणार नाही. त्याची तरतूद कलम 234F मध्ये करण्यात आलीय. एकूण उत्पन्न म्हणजे कलम 80 सी आणि 80 यू अंतर्गत कर सूट न घेता जे उत्पन्न केले जाते, त्याला एकूण उत्पन्न म्हणतात.
आयकर गणनेमुळे निर्माण झालेल्या दायित्वाच्या 90 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम आगाऊ कर किंवा टीडीएस म्हणून जमा केल्यास उर्वरित रकमेवर 1 एप्रिल 2021 पासून 1 टक्के दराने व्याज देण्याची तरतूद आहे. रिटर्न भरताना काही कर भरायचा असल्यास तो व्याजासह स्व-मूल्यांकन करासोबत जमा करावा लागेल. हे व्याज 1 टक्के दराने आकारले जाईल.
वेबसाईटमधील त्रुटीमुळे आयटीआर भरण्याची तारीख वाढवण्यात आली. यामुळे करदात्यांनी व्याज भरल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारने स्पष्ट केले आहे की, ज्यांचे सेल्फ-असेसमेंट कर दायित्व 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल, तर त्यांना व्याज भरावे लागणार नाही. जर एखाद्या व्यक्तीचे कर दायित्व 10 हजार रुपये किंवा अधिक असेल, तर त्याला आगाऊ कर भरावा लागेल. जे करदाते आगाऊ कर भरत नाहीत, परंतु त्यांचे स्वयं-मूल्यांकन कर दायित्व 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना 31 जुलै किंवा 31 ऑक्टोबरपासून 1 टक्के दराने व्याज द्यावे लागेल.
जर तुम्ही अजून तुमचा ITR दाखल केला नसेल तर शेवटच्या तारखेची वाट पाहू नका, उच्च व्याज टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर रक्कम कर भरा.
संबंधित बातम्या
महिन्याला 1500 रुपये जमा करा, तुम्हाला 35 लाख मिळतील, जाणून घ्या सर्वकाही
एअर इंडिया पुन्हा एकदा टाटा समूहाच्या ‘हाती’; आता रतन टाटा म्हणतात…
Fill out your ITR before 31st December, save interest money by paying tax liability