नवी दिल्लीः How to get UAN Online: जर तुम्ही नोकरी करत असाल आणि EPFO चे सदस्य असाल तर UAN नंबर तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) जारी करते. UAN वापरून तुम्ही तुमचे EPF खाते ट्रॅक करू शकता, तुमचे पासबुक ऑनलाईन पाहू शकता. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पीएफ खाते असल्यास तुम्ही UAN वापरून तुमच्या सर्व पीएफ खात्यांचे तपशील एकाच ठिकाणी पाहू शकता. तुम्ही तुमचा UAN नंबर घरबसल्या ऑनलाईन जाणून घेऊ शकता.
सर्व प्रथम EPFO च्या वेबसाईटवर जा, यासाठी तुम्हाला या लिंकवर जावे लागेल- epfindia.gov.in.
त्यानंतर Our Services या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर सदस्य UAN/ ऑनलाईन सेवा (OCS/ OTCP) वर जा.
आता Know Your UAN Status वर क्लिक करा.
यासाठी सर्वप्रथम तुमचा सदस्य आयडी किंवा आधार क्रमांक किंवा पॅन टाका.
त्यानंतर तुमचा तपशील जसे की नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी द्या.
त्यानंतर कॅप्चा टाका आणि Get Authorization Pin वर क्लिक करा.
या टप्प्यांचे अनुसरण केल्यानंतर तुम्हाला तुमचा UAN क्रमांक एसएमएसद्वारे पाठविला जाणार आहे.
तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. वयाच्या 55 वर्षांनंतर तुम्ही निवृत्तीनंतर पैसे काढू शकता. याशिवाय निवृत्तीपूर्वीही अनेक कारणांसाठी तुम्ही तुमच्या EPF खात्यातून पैसे काढू शकता. तुम्ही घर खरेदी किंवा बांधकाम, मुलाचे लग्न आणि शिक्षण आणि कोरोना व्हायरसच्या काळात कोणत्याही आर्थिक आणीबाणीसाठी पैसे काढू शकता. तुम्ही घरी बसून पीएफ काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
तसेच तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर पीएफ खात्याचे तपशील देखील पाहू शकता. हे उमंग (युनिफाइड मोबाईल अॅप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स) अॅपवर तपासले जाऊ शकते. हे अॅप भारत सरकारचे असून, ते अँड्रॉइडवरील गुगल प्ले स्टोअर आणि आयफोनवरील अॅपल अॅप स्टोअरवरून डाऊनलोड केले जाऊ शकते. या अॅपद्वारे ईपीएफ सदस्यांना पासबुक पाहणे, पीएफसाठी दावा करणे इत्यादी विविध सुविधा मिळू शकतात.
संबंधित बातम्या
Gold Silver Price Today : सोने स्वस्त, चांदीचे भावही घसरले, वाचा ताजे दर
सॉवरेन गोल्ड बाँडची नवी योजना सुरू, सोने खरेदीसाठी याहून चांगला ‘मुहूर्त’ नाही, हे आहे कारण