मुंबई: भारत पे एमडी आणि शार्क टँक शार्क अशनीर ग्रोव्हर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशनीर ग्रोव्हर आणि त्याची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर सह त्याच्या कुटुंबातील 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशनीर ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबीयांवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. 81 कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्याविरोधात FIR दाखल केला आहे. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण आणि हा फसवणुकीचा खेळ कधी सुरू झाला.
Bharatpe चे एमडी अशनीर ग्रोव्हर यांच्यावर गेल्या वर्षी कंपनीच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप होता. त्यांच्यावर 81 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. ईओडब्ल्यूने अशनीर ग्रोव्हर, त्याची पत्नी यांच्यासह 81 जणांविरोधात 5 वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये बँकिंग, बिझनेस आणि एजंटकडून फसवणूक झाल्याच्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिनटेक युनिकॉर्न भारत पे आणि अश्नीर ग्रोव्हर यांच्यात गेल्या वर्षभरापासून वाद सुरू आहे. अशनीर ग्रोव्हरवर गेल्या सहा महिन्यांत पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यावर कोट्यवधी रुपयांचा अपहार, विश्वासघात, साक्षीदार नष्ट करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
द मिंटच्या वृत्तानुसार, EOW ने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अशनीर ग्रोव्हरची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर, दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्यावर भादंविच्या कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र TV9 ने या लोकांविरोधात FIR ला दुजोरा दिलेला नाही.