Multibagger Stock : केवळ 11 दिवसांत पैसे डबल! यावर्षांत झटपट श्रीमंत करणारा हा शेअर तरी कोणता

| Updated on: Jan 18, 2023 | 10:08 AM

Multibagger Stock : बाजारात घसरणीचे सत्र सुरु असतानाही या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले.

Multibagger Stock : केवळ 11 दिवसांत पैसे डबल! यावर्षांत झटपट श्रीमंत करणारा हा शेअर तरी कोणता
जोरदार घोडदौड
Follow us on

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) अनेक असे शेअर आहेत, ज्यांनी बाजाराच्या विरुद्ध जोरदार कामगिरी बजावली. या मल्टिबॅगर शेअरने (Multibagger Share) गुंतवणूकदारांना झटपट परतावा मिळून दिला. नवीन वर्षाची सुरुवात होऊन अवघे 17 दिवस झाले आहेत. या काळात एका कंपनीच्या शेअरने धमाका उडवून दिला आहे. या शेअरने अवघ्या 11 दिवसांत गुंतवणूकदारांची रक्कम दामदुप्पट केली. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या (Investors) आनंदाला पारावार उरला नाही.शेअर बाजाराला घसरणीचे ग्रहण लागलेले असतानाही या शेअरने तेजीचे सातत्य टिकवून ठेवले आहे. येत्या काही दिवसांत शेअर किती सूसाट धावतो, याकडे तज्ज्ञांचे लक्ष आहे.

श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट (Shriram AMC) असे या कंपनीचे नाव आहे. हा या वर्षातील पहिला मल्टिबॅगर स्टॉक ठरला. या शेअरने गुंतवणूकदारांना केवळ 11 महिन्यात मालामाल केले. त्यांचा पैसा डबल केला. त्यामुळे पडझडीच्या सत्रातही गुंतवणूकदारांची चांगली कमाई झाली.

श्रीराम अॅसेट मॅनेजमेंटच्या शेअरने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. गेल्या व्यापारी सत्रात सोमवारी या स्टॉकची किंमती जवळपास 10 टक्क्यांनी वाढली. हा स्टॉक 231.90 रुपयांवर पोहचला. सोमवारी हा शेअर लाल निशाण फडकवत होता. त्यामुळे गुंतवणूकदार अचंबित होते.

हे सुद्धा वाचा

बाजाराच्या पडझडीचा परिणाम या शेअरवर दिसून आला. हा शेअर 5 टक्क्यांनी घसरुन 220.35 रुपयांवर व्यापार करत होता. तरीही या शेअरने कमाल केली. स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले. या शेअरने अवघ्या 11 दिवसांत गुंतवणूकदारांची रक्कम दामदुप्पट केली.

मंगळवारी घसरणीच्या सत्रात या शेअरने सर्वात मोठी कमाल केली. अकरा दिवसांतच गुंतवणूकदारांची रक्कम दुप्पट केली. या शेअरने दोन आठवडे पूर्ण होण्याअगोदरच गुंतवणूकदारांना 110 टक्क्यांचा परतावा दिला. कमी कालावधीत गुंतवणूकदार श्रीमंत झाले.

एका निश्चित कालावधीत, कमी वेळेत गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा देणाऱ्या स्टॉकला मल्टिबॅगर म्हटले जाते. श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने असा भीमपराक्रम करुन गुंतवणूकदारांना झटपट श्रीमंत केले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार खूश आहेत.

श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट कंपनी हा श्रीराम समूहाचा एक भाग आहे. श्रीराम म्युच्युअल फंड नावाने ही कंपनी व्यवसाय करते. या वर्षाच्या सुरुवातीला, 1 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 110.15 रुपये होता. 16 जानेवारी रोजी या शेअरची किंमत 231.90 रुपये होती. गुंतवणूकदारांचे एक लाख रुपयांचे झटपट 2 लाख रुपये झाले.

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, स्टॉकच्या कामगिरीची माहिती आहे.  त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी अभ्यास करुन, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पाऊल उचला.