पाच आणि दहा रुपयांचे नाणी विका आणि लाखो कमवा, जाणून घ्या कसं

| Updated on: Dec 19, 2020 | 12:13 AM

तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता (Five and Ten rupees vaishno mata coins will make you millionaire).

पाच आणि दहा रुपयांचे नाणी विका आणि लाखो कमवा, जाणून घ्या कसं
Follow us on

मुंबई : कोरोना संकट काळात संपूर्ण जग आर्थिक संकटातून झुंजत आहे. अशा परिस्थितीतही तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला फारशी काही मेहनत करण्याची जास्त आवश्यकता नाही. तुमच्याकडे फक्त 5 आणि 10 रुपयांचे प्राचीन नाणी असणं जरुरीचं आहे. तुम्हाला या नाण्यांचा फोटो विक्रीसाठी वेबसाईटवर ठेवावा लागेल. त्यानंतर लोक तुमच्या नाण्यांसाठी बोली लावतील. तुम्ही हव्या तशा किंमतीत नाणी विकून लाखो रुपये कमवू शकाल (Five and Ten rupees vaishno mata coins will make you millionaire).

लखपती कसं होणार?

इंडियामार्ट या वेबसाईटवर जुने, प्राचीन नाणे आणि नोटांचा लिलाव सुरु आहे. तुम्हालाही जर प्राचीन वस्तू गोळा करण्याची आवड असेल तर तुमची ही आवड तुम्हाला लखपती बनवू शकते. यासाठी 5 किंवा 10 रुपयांच्या नाण्यांवर वैष्णवी देवीचं चित्र असणं आवश्यक आहे.

वैष्णवी देवीच्या चित्राच्या नाण्यांना जास्त डिमांड

तुमच्याजवळ असलेल्या पाच आणि दहा रुपयाच्या नाण्यांवर वैष्णवी देवीचा फोटो असेल तर तुम्ही ते नाणे विकून पैसे कमवू शकता. पैसे कमवण्याची ही पद्धत सध्या ई-कॉमर्स कंपनीवर ट्रेंड करत आहे.

2002 साली नाणी जारी

या नाण्यांना 2002 साली जारी करण्यात आलं होतं. नाण्यावर देवीचं चित्र असल्याने हे नाणे लकी मानले जात आहेत. हिंदू धर्मात वैष्णवी देवीची पूजा केली जाते. त्यामुळेच लोक वैष्णवी देवीचे चित्र असलेले नाणे लाखो रुपयांना विकत घेत आहेत.

किती रुपये कमवू शकता?

ही नाणी लिलावात विकून तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत कमावू शकता. याव्यतिरिक्त, या नाण्यांची बोली लावताना तुम्ही नाण्यांची किंमत कमी-जास्तही करु शकता (Five and Ten rupees vaishno mata coins will make you millionaire).

हेही वाचा : कोरोना काळातही गौतम अदानींनी दिवसाला कमावले 456 कोटी रुपये, मुकेश अंबानी, बिल गेट्स यांनाही मागे टाकलं!