Ratan Tata Death : रतन टाटा यांच्या जीवनात आदर्शवत होते. रतन टाटांच्या औदार्य, माणुसकी आणि नम्रतेच्या अनेक कहाण्या आहेत. त्यांनी नेहमी उद्योगापेक्षाही देशाला प्रथम प्राधान्य दिले. व्यक्ती कितीही मोठा झाला तरी जमीनीवर कसा राहू शकतो, त्याचे उदाहरण म्हणजे रतन टाटा होते.
प्रसिद्ध उद्योगपती सुहैल सेठ यांनी रतन टाटा यांच्या जीवनातील एक हृदयस्पर्शी किस्सा शेअर केला होता. सुहेल सेठ यांनी एका मुलाखतीत सांगितले की, फेब्रुवारी 2018 मध्ये ब्रिटिश राजघराण्याला रतन टाटा यांना लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करायचे होते. स्वतः प्रिन्स चार्ल्स त्यांचा सन्मान करणार होते. 6 फेब्रुवारी 2018 रोजी रतन टाटा यांचा सन्मान होणार होता. पण, 3 फेब्रुवारी रोजी रतन टाटा यांनी येण्यास नकार दिला. त्यामागे त्यांनी दिलेले कारण प्रिन्स चार्ल्स यांच्या हृदयाला भिडले. रतन टाटा यांनी सुहेल यांना फोन करुन सांगितले मी या अवॉर्ड फंक्शनला येऊ शकणार नाही. कारण टँगो आणि टिटो आजारी आहे. या परिस्थितीत मी त्यांना एकटे सोडू शकत नाही. म्हणजे रतन टाटा मानवावरच नाही तर प्राण्यांवर किती प्रेम करत होते.
सन 1992 मध्ये इंडियन एअरलाइन्सचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांना विचारण्यात आले, दिल्ली ते मुंबई दरम्यान कोणता प्रवाशी आहे, ज्यांनी तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव टाकला. त्यात सर्वाधिक कर्मचाऱ्यांनी रतन टाटा यांचे नाव सांगितले. जेव्हा त्याचे कारण शोधले तेव्हा समजले, ते एकमेव असे व्हिआयपी होते, जे नेहमी एकटे जात होते. त्यांच्यासोबत त्यांची बॅग आणि फाईल उचलण्यासाठीसुद्धा असिस्टेंट नव्हता. विमानाचे उड्डान होताच ते आपले काम सुरु करत होते. ते नेहमी कमी साखरचे ब्लॅक कॉफी घेत असते. ते कधी फ्लाइट अटेंडेंटवर रागावलेसुद्धा नाही.
गिरीश कुबेर यांनी टाटा समूहावर ‘द टाटस हाऊ अ फॅमिली बिल्ट अ बिझनेस अँड अ नेशन’ हे पुस्तक लिहिले. त्यामध्ये ते लिहितात, “जेव्हा ते टाटा सन्सचे प्रमुख झाले तेव्हा ते जेआरडीच्या खोलीत बसले नाहीत. स्वत: बसण्यासाठी त्यांनी एक साधी छोटी खोली निवडली. ते एका कनिष्ठ अधिकाऱ्याशी बोलत असताना एक वरिष्ठ अधिकारी आला की त्याला थांबायला सांगायचे. त्याच्याकडे ‘टिटो’ आणि ‘टँगो’ हे दोन जर्मन शेफर्ड कुत्रे होते, ज्यांवर त्याचे अपार प्रेम होते.
रतन टाटा वेळेचे नेहमी पालन करत होते. ते ठीक ६.३० वाजता आपला कार्यालय सोडत होते. कार्यालयातील कामासंदर्भात घरी कोणी त्यांच्याशी संपर्क केला तर ते रागवत होते. ते घरी एकांतात फाईले आणि दुसरी कामे पार पाडत होते. जर तो मुंबईत असेल तर विकइंडमध्ये ते अलिबाग येथील फार्म हाऊसवर जात होते. त्यावेळी त्याच्यासोबत कुत्र्यांशिवाय कोणीही नव्हते. त्यांना प्रवासाची किंवा भाषणांची आवड नव्हती.
1998 मध्ये टाटा मोटर्सने ‘इंडिका’ कार बाजारात आणली. परंतु ती अयशस्वी ठरली. यामुळे रतन टाटा यांनी फोर्ड मोटर कंपनीला ती विकण्याचा निर्णय घेतला. जेव्हा रतन टाटा यांनी बिल फोर्डला याबाबत विचारले. तेव्हा ते म्हणाले, तुम्हाला या व्यवसायाची पुरेशी माहिती नसताना या क्षेत्रात का आले. इंडिका त्यांनी घेतली तर ते मोठे उपकार करतील, या आशायने फोर्ड टाटांशी बोलले. त्यामुळे रतन टाटा नाराज झाले आणि त्यांनी बैठक सोडून दिली. मग एका दशकानंतर परिस्थिती बदलली. 2008 मध्ये फोर्ड कंपनी आर्थिक संकटात आली. तिने त्यांचे ब्रिटीश लक्झरी ब्रँड जग्वार आणि लँड रोव्हर विकण्याचा निर्णय घेतला. मग बिल फोर्डने कबूल केले भारतीय कंपनीने या कंपन्या घेतल्या तर त्यांच्यावर खूप उपकार होतील. रतन टाटा यांनी हे दोन प्रसिद्ध ब्रँड US$2.3 बिलियनमध्ये विकत घेतले.