मुदत ठेव (Fixed deposit) हे गुंतवणुकीचे पारंपरिक साधन आहे. वाढती महागाई आणि व्याज कमी झाल्याने गुंतवणूकदारांचा त्याकडे असलेला ओढा अलीकडच्या काळात खूप कमी झाला आहे. मुदत ठेवींंवरील व्याजावर कर आकारला जातो. एखाद्या आर्थिक वर्षात (Fiscal Year)मर्यादेपेक्षा व्याजातून जास्त उत्पन्न मिळत असेल तर बँक तुमच्या उत्पन्नातून करकपात (TDS) करते.. 40 हजारांपर्यंतच्या व्याज उत्पन्नावर कोणताही टीडीएस कापला जात नाही. त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास टीडीएस कापला जातो. मुदत ठेवींमधून मिळणारे व्याज हे तुमच्या उत्पन्नात समाविष्ट होते.
आपण ज्या दराने टॅक्स स्लॅबमध्ये येता त्या दराने आपल्याला कर जमा करावा लागतो. गेल्यावर्षी मुदत ठेव योजनेमध्ये 5.1 टक्के परतावा मिळाला होता. महागाई दर आजच्या इतकाच राहिला अथवा महागाई यापेक्षा वाढली तर बँकांना मुदत ठेव योजनेवर व्याज दर वाढवावा लागेल. त्यामुळे मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांचा फायदा होऊ शकतो. चांगल्या व्याजदरासाठी तुम्ही सध्याची एफडी जर मोडली तर त्यावर तुम्हाला दंड लागू शकतो.जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमच्या मुलाच्या नावाने एफडी उघडत असाल, तर कराबाबत काय नियम आहेत, जाणून घेऊयात .
एखाद्या पालकाने आपल्या 18 वर्षांवरील मुलाच्या नावे मुदत ठेव उघडल्यास कराचे नियम समजून घेणे गरजेचे आहे. कर तज्ज्ञांच्या मते वडिलांनी पाल्याच्या नावे केलेला हा व्यवहार एक तर भेटवस्तू ठरेल अथवा कर्ज रक्कम म्हणून दाखविता येईल. मुदत ठेव मुलाला भेट म्हणून देण्यात येऊ शकते. हा व्यवहार पूर्णपणे करमुक्त होईल. नातेवाईकाची भेट पूर्णपणे करमुक्त असते.
भेटवस्तूवर तुमचा हक्क नाही
ही रक्कम तुम्ही 18 वर्षांवरील मुलाला कर्ज म्हणूनही देऊ शकता. नंतर ही रक्कम तो मुदत ठेवींमध्ये गुंतवतो. आता व्याजातून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे करपात्र असेल. ही रक्कम मुलाला भेट म्हणून दिली तर त्या रक्कमेवरील आपला हक्क संपतो, हे लक्षात ठेवायला हवे. मुलांना मिळणारी रक्कम ही पूर्णपणे करमुक्त असेल कारण ती भेटवस्तू म्हणून दिलेली असेल.
एफडीवरील कराचे नियम
मुदत ठेवींवरील कराचे नियम ठरलेले आहे. एफडीवरही करबचत होते. कराचा फायदा मिळतो. एका आर्थिक वर्षांत मुदत ठेवीवरील दीड लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. ही सूट कलम 80 सी अंतर्गत उपलब्ध आहे. मात्र मुदत ठेवीवरील व्याज हे आयकरपात्र असते. आपल्या एकूण उत्पन्नात व्याजाची रक्कम जोडली जाते. नंतर टॅक्स स्लॅबनुसार कर जमा करावा लागतो. आर्थिक वर्षात व्याजाचे उत्पन्न 40 हजारांपेक्षा अधिक असेल तर टीडीएसही कापला जातो.
संबंधित बातम्या :
‘गुगल पे’ची धमाकेदार ऑफर; एका क्लिकवर 1 लाख रुपयांपर्यंतचं वैयक्तिक कर्ज