परकीय चलन गंगाजळीत पुन्हा एकदा घट; जाणून घ्या अर्थव्यवस्थेसाठी किती महत्त्वपूर्ण असते परकीय चलन

| Updated on: Nov 20, 2021 | 7:10 AM

देशाच्या परकीय चलन गंगाजळीत पुन्हा एकदा घट झाली आहे. नव्याने जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार परकीय चलन  गंगाजळी 763 अब्ज डॉलरवरून 640अब्ज डॉलरवर घसरली आहे.

परकीय चलन गंगाजळीत पुन्हा एकदा घट; जाणून घ्या अर्थव्यवस्थेसाठी किती महत्त्वपूर्ण असते परकीय चलन
डॉलर
Follow us on

नवी दिल्ली : देशाच्या परकीय चलन गंगाजळीत पुन्हा एकदा घट झाली आहे. नव्याने जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार परकीय चलन  गंगाजळी 763 अब्ज डॉलरवरून 640अब्ज डॉलरवर घसरली आहे. परकीय गंगाजळीत सातत्याने घट सुरूच असून, 5 नोव्हेंबरला जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार परकीय चलनामध्ये 1.14 अब्ज डॉलरची घट झाली होती.

रुपया मजबूत होतो

देशाच्या विकासामध्ये परकीय चलनाचे अनन्यसाधारण महत्व आहे. देशामध्ये परकीय चलन किती आहे, त्यावरूनच आरबीआयचे चलनविषयक धोरण ठरत असते. आपल्याकडे जेवढ्या प्रमाणात परकीय चलनाचा साठा असेल तेवढ्या अधिक प्रमाणात रुपया इतर चलनाच्या तुलनेत मजबूत होतो. परकीय चलनाच्या साठ्यात घट झाल्यास रुपयाच्या मूल्यात देखील घट होते.

आयातीसाठी परकीय चलनाची आवश्यकता

भारत इतर देशांकडून मोठ्या प्रमाणात विविध वस्तुंची आयात करत असतो,  इतर देशांकडून वस्तू  आयात करताना बिल हे डॉलरमध्ये द्यावे लागते. त्यामुळे जर आपल्याकडे मोठ्याप्रमाणात विदेशी चलन असेल, तर कुठलीही वस्तू  आयात करताना समस्या उद्धभवत नाही. तसेच रुपया मजबूत होऊन महागाई देखील नियंत्रणात राहाते.

विदेशी गुंतवणूक वाढीचे संकेत 

एखाद्या देशाच्या परकीय चलन साठ्यात सातत्याने वाढ होत असेल तर ते त्यासाठी सकारात्मक संकेत असतात. परकीय चलनाचा साठा वाढत आहे, याचाच दुसरा अर्थ असा होतो की परकीय गुंतवणूकदार देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. देशात गुंतवणूक वाढल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराची देखील निर्मीती होते.

संबंधित बातम्या 

क्रिप्टोकरन्सीच्या मान्यतेबाबत सरकार संभ्रमात; गुंतवणूकदारांची चिंता वाढली, जाणून घ्या काय आहे समस्या?

वर्षभरात काळ्या मिऱ्याचे भाव 5 पटीने वाढले; जाणून घ्या दर वाढीमागील कारणे

ऑनलाईन विमा खरेदीला पंसती; वर्षभरात ग्राहकांची संख्या दुपटीने वाढली