नवी दिल्लीः टाटा समूहाच्या नावाने गेल्या काही दिवसांपासून फसवणूक सुरू आहे, ज्याबद्दल लोकांना ग्रुपच्या वतीने ट्विट करून इशारा देण्यात आलाय. या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, टाटा समूह किंवा त्याची कोणतीही कंपनी अशा प्रकारे कोणताही जाहिरात्मक मेसेज करत नाही. त्यामुळे तुमची दिशाभूल करून तुम्हाला कोणी जाळ्यात ओडत असल्यास ते टाळा आणि लोकांनाही असे मेसेज फॉरवर्ड करू नका.
एका जाहिरात्मक मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, टाटा समूहानं 150 वर्षे पूर्ण केल्याबद्दल कंपनीकडून एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात भाग घेणाऱ्यांना टाटा नेक्सन ईव्ही वाहन मिळणार आहे. या मेसेजबद्दल टाटा समूहाने आता सतर्कतेचा इशारा दिलाय. आमच्याकडून अशा प्रकारचा कोणताही प्रचारात्मक उपक्रम आयोजित केला गेला नाही. त्यामुळे फेक मेसेजपासून सावध राहा.
टाटा समूहाने आपल्या इशाऱ्यांत म्हटले आहे की, जेव्हा जेव्हा असे मेसेज येतात, तेव्हा सर्वप्रथम त्याचा स्रोत काय आहे ते शोधा. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी मेसेज अनेक वेळा नीट वाचा. जर टाटा समूहाशी संबंधित कोणताही दावा केला जात असेल तर त्याची माहिती कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि त्याच्या वेबसाईटवरदेखील उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत तिथे जा आणि त्याचे सत्य तपासा.
#FakeNotSafe
Tata Group or its companies are not responsible for this promotional activity. Please do not click on the link and/or forward it to others.Know more here: https://t.co/jJNfybI9ww pic.twitter.com/AA38T0oqHn
— Tata Group (@TataCompanies) October 1, 2021
या व्यतिरिक्त, त्याचे url पाहा. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी जर तुम्ही त्याची URL पाहिली, तर ती फेक आहे की खरी हे कळेल. जर तुम्हाला वाटत असेल की हा एक बनावट मेसेज आहे आणि त्यातून फसवणूक होऊ शकते, तर असा मेसेज कोणालाही फॉरवर्ड करू नका.
Read that message twice before clicking on the link or forwarding it to others. #FakeNotSafe pic.twitter.com/g8GDWTrJQ2
— Tata Group (@TataCompanies) September 11, 2021
संबंधित बातम्या
मध्य रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक, ‘या’ गाड्या होणार प्रभावित
…तर आता रेल्वे त्यांच्या 94 शाळा बंद करणार, जाणून घ्या योजना काय?