राज्यात इंधन दरवाढीचा भडका; सर्वात महाग पेट्रोल मुंबईमध्ये

| Updated on: Mar 23, 2022 | 2:24 PM

आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईचा समावेश हा देशातील टॉप चार महानगरामध्ये होतो, मुंबईमध्ये देखील पेट्रोल दर वाढीचा भडका उडाला आहे. सलग दोन दिवस इंधनाच्या दरात झालेल्या वाढीमुळे शहरात पेट्रोल प्रतिलिटर 110. 82 रुपयांवर पोहोचले आहे.

राज्यात इंधन दरवाढीचा भडका; सर्वात महाग पेट्रोल मुंबईमध्ये
Follow us on

मुंबई :  देशात सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या (Diesel) किमतीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही आठवड्यापासून सातत्याने कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीमध्ये वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल, डिझेलचे दर वाढवले जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र दहा मार्चनंतर देखील काही दिवस इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. अखेर मंगळवारपासून इंधन दरवाढीला सुरुवात झाली असून, आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईचा समावेश हा देशातील टॉप चार महानगरामध्ये होतो, मुंबईमध्ये देखील पेट्रोल दर वाढीचा भडका उडाला आहे. सलग दोन दिवस इंधनाच्या दरात झालेल्या वाढीमुळे शहरात पेट्रोल प्रतिलिटर 110. 97 रुपयांवर पोहोचले आहे. तर एक लिटर डिझेलसाठी मुंबईकरांना 95 रुपये मोजावे लागत आहेत. वाढत्या पेट्रोल,डिझेलच्या दरवाढीचा मोठा फटका हा मुंबईकरांना बसण्याची शक्यता आहे.

ठाण्यातही पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

दरम्यान दुसरीकडे ठाण्यात देखील पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने उच्चांक गाठला आहे. आज झालेल्या इंधनदरवाढीनंतर ठाण्यात पेट्रोल 110. 82 तर डिझेल 95.14 रुपये झाले आहे. देशातील जवळपास सर्वच मेट्रो सीटीमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत पेट्रोल, डिझेल स्वस्त असल्याने महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील नागरिक पेट्रोल भरण्यासाठी गुजरात राज्यात जाताना दिसून येत आहेत.

4 नोव्हेंबर 2021 नंतर प्रथमच इंधनाच्या दरात वाढ

चार नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केल्याने पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर मात्र इंधनाचे दर स्थिर होते. निवडणुकांच्या निकालानंतर इंधनाचे दर वाढतील अशी अपेक्षा होती आणि अखेर अपेक्षेप्रमाणे इंधनाचे दर वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दोन दिवस वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या

‘या’ बँकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनीमध्ये कमाईच्या संधी, शेअरमध्ये 35 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

निर्यातीसाठी ठरवलेलं टार्गेट भारत सरकारनं 9 दिवस आधीच पूर्ण केलं! 400 अब्ज डॉलर्सचं लक्ष्य गाठण्यात यश

एफडीमध्ये गुंतवणूक करायचीये? या दहा बँकांबद्दल जाणून घ्या ज्या देतात सर्वोत्तम व्याज