Gaganyaan Mission | मिशन गगनयानआधी एका कंपनी मालामाल, महिन्याभरात कमावले 49 हजार कोटी

| Updated on: Sep 29, 2023 | 2:55 PM

Gaganyaan Mission | मागच्यावर्षी 29 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचा शेअर 1,798 रुपयांसह 52 आठवड्यांचा लोअर लेव्हलवर होता. आता कंपनीच्या शेअरमध्ये 70 टक्के वाढ दिसून आलीय. म्हणजे कंपनीतील गुंतवणूकदारांचा फायदाच फायदा आहे.

Gaganyaan Mission | मिशन गगनयानआधी एका कंपनी मालामाल, महिन्याभरात कमावले 49 हजार कोटी
Mission gaganyaan
Follow us on

मुंबई : आधी चांद्रयान 3, त्यानंतर आदित्य एल 1 आणि आता मिशन गगनयान. यात एका कंपनीच महत्त्वाच योगदान असणार आहे. मिशनला प्रत्यक्ष सुरुवात होण्याआधी या कंपनीचा शेअर उसळी घेतोय. 30 ऑगस्टपासून आतापर्यंत कंपनीच्या शेअरने 13 टक्के झेप घेतली आहे. महत्त्वाच म्हणजे या दरम्यान कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 49 हजार कोटी रुपयांची वाढ झालीय. कंपनीचा शेअर लाइफ टाइम हाय आहे. कंपनीला मुंबई अथॉरिटीकडून 7 हजार कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. त्याआधी साऊदी अरामकोकडून 4 अब्ज डॉलरची ऑर्डर मिळाली आहे. टेक आणि कंन्स्ट्रक्शन या दोन्ही क्षेत्रात कंपनीचा व्यवसाय जोरात सुरु आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येतेय. सध्या कंपनीचा शेअर कुठल्या लेव्हलला आहे हे जाणून घेऊया.

लार्सन टुब्रोच्या शेअर्समध्ये शुक्रवारी तेजी दिसून आली. बीएसईच्या आकड्यांनुसार, दुपारी 12 वाजून 14 मिनिटांनी कंपनीचा शेअर 0.73 टक्के म्हणजे 22.10 रुपये वाढीसह 3033.95 रुपयासह व्यवसाय करतोय. आज कंपनीचा शेअर 3044.15 रुपयांवर ओपन झाला. 3006 रुपयांसह लोअर लेव्हलला गेला होता. एकदिवसापूर्वी कंपनीचा शेअर 3011.85 रुपयांवर बंद झाला होता. 3 तासात कंपनीच्या शेअरमध्ये 1.50 टक्के वाढ दिसून आली. व्यवसायाच सत्र सुरु असून कंपनीचा शेयर लाइफ टाइम हायवर पोहोचला होता. कारोबारी सत्रादरम्यान कंपनीचा शेअर 1.49 टक्के वाढीसह 3057 रुपयांवर पोहोचला होता. मागच्या महिन्याभरात कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

मार्केट कॅप 49 हजार कोटी

बीएसईच्या आकड्यानुसार, कंपनीच्या शेअरमध्ये 13 टक्के वाढ दिसून आलीय. 30 ऑगस्टला कंपनीचा शेअर 2708.80 रुपयावर क्लोज झाला होता. महत्त्वाच म्हणजे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये सुद्धा वाढ झालीय. 30 ऑगस्टला क्लोजिंग प्राइसवर कंपनीची मार्केट कॅप 3,80,762.12 कोटी रुपये होती. आज शेअर 3057 रुपयांवर पोहोचल्यानंतर मार्केट कॅप 4,29,706.81 कोटी रुपयांवर पोहोचली. म्हणजे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये जवळपास 49 हजार कोटी रुपयांची वाढ दिसून आलीय.