Ganesh Chaturthi 2024 : लाडक्या बाप्पाला चांदीचा साज, पूजासाहित्यासह दागिने खरेदीसाठी भाविकांची झुंबड

| Updated on: Sep 06, 2024 | 9:23 AM

Bappa Silver Ornaments Jalgaon : आता भाविक भक्तांना गणपती बाप्पाची आस लागली आहे. बाप्पाचे आगमन होत आहे. खरेदीसाठी भाविकांची बाजारात गर्दी उसळली आहे. लाडक्या बाप्पांना आभुषणांचा साज करण्यासाठी जळगावच्या सराफा बाजारात भाविक भक्तांनी एकच गर्दी केली आहे.

Ganesh Chaturthi 2024 : लाडक्या बाप्पाला चांदीचा साज, पूजासाहित्यासह दागिने खरेदीसाठी भाविकांची झुंबड
बाप्पा मोरया
Follow us on

लाडक्या गणरायाचे उद्या घरोघरी आगमन होत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अबालवृद्धा आतुरले आहेत. बाप्पाच्या आगमनावेळी आणि पुढील दहा दिवसांतील पूजेत कोणतीची कमतरता नसावी यासाठी भाविक काळजी घेत आहे. काही हौशी भक्तांनी गणरायाला चांदीची आभूषण करण्याचा संकल्प यंदा पूर्ण केला आहे.लाडक्या बाप्पासाठी लागणारे चांदीचे आभूषण घेण्यासाठी जळगावच्या सराफ बाजारात नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. गेल्या आठवडाभरापासून अनेक भक्तांनी चांदीचा साज खरेदी केला आहे. पूजेच्या साहित्यापासून ते गणेशाला आभूषणापर्यंतची खरेदी करण्यात आली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात बाप्पाला लागणाऱ्या चांदीचा मोदक, दूर्वा, मुकुट, गळ्यातील माळ, चांदीचा जास्वंदाचे फुल, पान, जानव अशा वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लाडक्या बाप्पासाठी नागरिक जळगावच्या सराफ बाजारातून वेगवेगळ्या चांदीच्या वस्तू खरेदी करताना पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. असे असले तरी बाप्पाचा उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी नागरिक चांदीचे आभूषण खरेदी करत आहेत.

चांदी २० हजारांनी महागली

हे सुद्धा वाचा

गेल्या वर्षापेक्षा तब्बल २० हजार रुपयांनी चांदीचे भाव वाढलेले असताना सुद्धा लाडक्या बाप्पासाठी नागरिक चांदीचे आभूषण खरेदी करताना पाहायला मिळत आहे. वर्षातून एकदा बाप्पा आपल्या घरी येत असतो त्यामुळे त्याला आनंद मिळावा त्याचा उत्सव आनंदात साजरा व्हावा यासाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळत आहेत. अवघ्या काही तासांवर बाप्पाचा आगमन येऊन ठेपला असून त्यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीत सुद्धा मोठ चैतन्याचं वातावरण पाहायला मिळत आहे.

चांदीच्या बाप्पाला पण मागणी

दरवर्षी प्रमाणे अनेक भाविकांनी राज्यात चांदीच्या गणपतीची खरेदी केली आहे. लहान, मध्यम आणि मोठ्या चांदीच्या मूर्तींना मोठी मागणी आली आहे. चांदीच्या दुर्वा, दुर्वांचा हार, जास्वंदीचे फुल, हार, विडा, सुपारी, मोदक, मोदकांची रास, तुळस, तुळशी वृदांवन, केवड्याचे पान, निरांजणी, दिवा, पंचपाळे, बाजबूंद, उंदिरमामा, पाट, ताम्हण, गडवा, पेला, तक्क्या, पळी यासारख्या चांदीच्या आभूषणांना मोठी मागणी आहे.