Gautam Adani | जगातील टॉप 10 अरबपतींमध्ये (Top 10 Billionaires) भारतातील उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नावाचा पुन्हा डंका वाजला. काही दिवसांपू्र्वी श्रीमंतांच्या यादीत घसरल्यानंतर अदानी यांनी मागे वळून पाहिलेच नाही. अदानी हे श्रीमंतीच्या एकामागून एक पायऱ्या चढत आहेत. ते आता जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती (World 3rd Richest) बनले आहे. अदानी आणि जगातील चौथे श्रीमंत जेफ बेजोस (Jeff Bezos) यांच्यात केवळ 12.1 अरब डॉलरचा फरक आहे.
फोर्ब्सच्या रियल टाईम (Forbes Real Time) दशलक्ष निर्देशांकात (Billionaires Index) अदानी समुहाचे संचालक गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाल्याची नोंद झाली. त्यांची एकूण संपत्ती 148.8 अरब डॉलर झाली आहे.
संपत्तीतील लक्षणीय वाढीमुळे अदानी यांनी अॅमेझॉनचे जेफ बेजोस यांना धोबीपछाड दिली. फोर्ब्सच्या माहितीनुसारत, जेफ बेजोस यांची संपत्ती कमी होऊन ती 136.7 अरब डॉलर इतकी राहिली आहे.
अदानी यांच्या सपंत्तीचे आकडे दिवसागणिक वाढत असल्याने ते लवकरच बेजोस यांना मात देतील ही चर्चा होती. ती चर्चा अखेर खरी ठरली. बेजोस आता जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे.
बेजोस आणि अदानी यांच्या संपत्तीमधील अंतर 12.1 अरब डॉलर इतके आहे. आता अदानी यादीतील इतर दोघांच्या स्पर्धेत उतरले आहेत. संपत्तीत वाढ होत राहिली तर लवकरच दुसऱ्या स्थानी दिसतील, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
श्रीमंतांच्या यादीत आता पहिल्या स्थानी टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) तर दुसऱ्या स्थानी बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) यांचा समावेश आहे. त्यांच्यानंतर गौतम अदानी यांनी स्थान पटकावलं आहे. गौतम अदानी यांच्या श्रीमंतीचा वेग सर्वांनाच थक्क करणारा आहे. एकीकडे त्यांच्या कंपन्यांवर कर्जाचा डोंगर वाढत असताना त्यांची ही घौडदौडही सुरुच आहे.