मुंबई : जगातील श्रीमंतांच्या यादीत (latest richest man in the world) गौतम अदानी हे आता दुसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. एलन मस्कनंतर आता गौतम अदानी यांचा नंबर लागलाय. त्यामुळे गौतम अदानी (gautam adani news) यांना पहिलं स्थान गाठण्यासाठी एलन मस्क यांना मागे टाकावं लागेल. फोर्ब्सने जारी केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत गौतम अदानी यांनी दुसऱ्या स्थानी झेप घेतल्याचं समोर आलंय.
गौतम अदानी बर्नाड अर्नाल्ट यांना मागे टाकलं आणि दुसरं स्थान पटकावलंय. तर बर्नार्ड हे सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत (worlds richest people) जगात तिसऱ्या स्थानी आहेत. याआधी बर्नार्ड हे दुसऱ्या स्थानी होते. पण आता गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाली असून त्यांनी दुसरं स्थान पटकावलं आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत गौतम अदानी यांच्या संपत्तीत तब्बल 5.5 अब्ज डॉलर इतकी घसघशीत वाढ नोंदवण्यात आलीय.
फोर्ब्सकडून रिअल टाईम बिलिअनेअर्स इंडेक्स जारी केली जाते. त्यानुसार गौतम अदानी यांच्या संपत्तीत घसघशीत वाढ नोंदवण्यात आलेली आहे.
दरम्यान, याआधी जेफ बेजोस, बिल गेट्, लॅरी एलिसन यांना गौतम अदानी यांनी श्रीमंतांच्या यादीत आधीच पछाडलं होतं. तर भारतात गौतम अदानी आणि मुकेश अदानी यांच्यातही सातत्यानं स्पर्धा पाहायला मिळाली आहे.
नंबर दोनवर जरी अदानी यांनी हनुमान उडी घेतली असली, तरी पहिलं स्थान पटकावण्यासाठी त्यांना अजून बराच लांबचा पल्ला गाठावा लागणार आहे. शिवाय त्या दरम्यान, आपलं स्थान टिकवून ठेवण्याचंही आव्हान त्यांच्यासमोर असेल.
दुसऱ्या स्थानासाठी अटीतटीची स्पर्धा फोर्स्बच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीत दिसतेय. कारण त्यात अवघ्या काही पॉईंटचाच फरक आहे. पण या यादीतील पहिलं स्थान आणि दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावरील श्रीमंतांच्या संपत्तीत तब्बल 100 अब्ज डॉलर इतका प्रचंड मोठा फरक आहे.
अदानी हा देशातील एक मोठा उद्यो समूह म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांत अदानींच्या शेअरनेही गुंतवणूकदारांना मालमाल केलंय. तसंच त्यांच्या व्यक्तिगत संपत्तीतही मोठा वाढ नोंदवण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठी बंदर ऑपरेटर करणारी कंपनी, थर्मल कोळसा उत्पादक, कोळसा व्यापारी, वीज निर्मिती, या सारख्या वेगवेगळ्या उद्योगांशी गौतम अदानी हे संलग्न आहेत.
एका रिपोर्टनुसार अदानी कंपनीच्या शेअर्रमध्ये गेल्या 2 वर्षात तब्बल अकराशे टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यातील अदानी ट्रान्समिशनचा शेअर 500 टक्क्यांपेक्षा जास्त तर अदानी एंटरप्रायझेसचा शेअर तब्बल 700 टक्क्यांपेक्षाही जास्त वाढला आहे. तर अदानी पोर्टच्या शेअरची किंमत 96 टक्क्यांपेक्षा अधिक वाढली आहे.