Gautam Adani Bribery case: भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजक गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत गुन्हा दाखल झाला आहे. एक प्रकल्प मिळवण्यासाठी गौतम अदानी यांनी लाच दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हा आरोप अमेरिकेत लागला आहे. परंतु ही लाच भारतीय अधिकाऱ्यांना दिली आहे. प्रकल्प भारताचा, लाचही भारतीय अधिकाऱ्यांना दिली, मग अदानी यांच्यावर अमेरिकेत गुन्हा का दाखल झाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
न्यूयॉर्कमधील फेडरल कोर्टात गौतम अदानीविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. न्यूयॉर्कच्या न्यायालयात एक खटला (इन्डाइटमेंट) दाखल केला गेला. ते एक प्रकारचे चार्जशीट आहे. त्यात अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी, त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्यासह आठ जणांना आरोपी केले गेले आहे. त्यात आरोप आहे की, भारतातील एक सोलर एनर्जी प्रकल्प मिळवण्यासाठी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना 2200 कोटी रुपयांची लाच दिली.
अमेरिकेतील सिक्योरिटी एंड एक्सचेंज कमीशन (SEC) ने हा आरोप लावला. त्या आरोपानुसार अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही लाच यासाठी दिली की पुढील 20 वर्षांत त्यांना या प्रकल्पातून 17 हजार कोटी रुपयांचा नफा होणार आहे. हा प्रकल्प भारतातील आहे. लाच घेणारे अधिकारी लाच देणारा व्यक्ती भारतीय आहे. मग अमेरिकेत खटला का दाखल झाला? त्याचे कारण म्हणजे या प्रकल्पात अमेरिकन गुंतवणूकदारांची गुंतवणूक होती. त्यांच्यापासून ही माहिती लपवण्यात आली. त्यामुळे अमेरिकेच्या न्यायालयात याचिका दाखल झाली आणि गौतम अदानींसह इतरांवर अटक वॉरंट बजावण्यात आले.
गौतम अदानी यांच्यावर अटक वॉरंट बजावण्यात आले. आता त्यांना अमेरिकन न्यायालयात आपल्या वकिलांकडून बाजू मांडावी लागणार आहे. त्यानंतर त्यांचे अटक वॉरंट रद्द होऊ शकतो. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो.बाइडेन यांना देखील हे अटक वॉरंट रद्द करण्याचा अधिकार आहे. आता या पैकी कोणता मार्ग गौतम अदानी अवलंबतात, हे येत्या काही दिवसांत