मुंबईःदेशातीलच नाही तर जगात औद्योगिक क्षेत्रात (Industrial area) ज्या घराण्याचा दबदबा होता ते घराणे म्हणजे अंबानी. धीरुभाई अंबानींचा आदर्श घेणारे अनेक उद्योजक आजही वेगवेगळ्या देशात आहेत. मात्र आता अंबानी बंधूमधील धाकटे बंधू अनिल अंबानी यांची रिलायन्स कॅपिटल (Reliance Capital) कंपनी कर्जदार झाली आहे. गौतम अदानी यांची कंपनी अदानी फायनान्शिअल सर्व्हिसेस, केकेआर, पिरामल फायनान्स आणि पूनावाला फायनान्ससह 14 मोठ्या कंपन्यांनी ही कंपनी खरेदी करण्यासाठी सरसावल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) नियुक्त केलेल्या प्रशासकाकडून बोली लावण्याची तारीख 11 मार्च ते 25 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.
अंबानीच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीला खरेदी करण्यासाठी Arpwood, वर्दे पार्टनर, मल्टिपल फंड, निप्पॉन लाइफ, जेस्सी फॉलॉवर्स, ब्रूकफिल्ड, Oaktree, अपोल्लो ग्लोबल, बॅकस्टोन, आणि Hero Fincorp या कंपन्यांचा समावेश आहे. ही तिसरी सर्वात मोठी नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) आहे ज्याच्या विरोधात मध्यवर्ती बँकेने अलीकडेच दिवाळखोरीत असल्याने त्या अंतर्गत दिवाळखोरीची कार्यवाही सुरू केली आहे. इतर दोन कंपन्या Srei Group NBFC आणि दिवान हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन (DHFL) आहेत.
ज्यांच्याकडून अनिल अंबानी यांच्या कंपनीसाठी काही संभाव्य बोलीदारांनी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) दाखल करण्यासाठी आणखी काही वेळ मागितला होता. त्यासाठी या कंपनींच्या विनंतीवरून बोली सादर करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. बहुतांश निविदाधारकांनी संपूर्ण कंपनीसाठी बोली लावल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी कार्यकारी संचालक नागेश्वर राव वाय यांची या बिगर बँकिंग वित्तीय कंपनीचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला, आरबीआय-नियुक्त प्रशासकाने रिलायन्स कॅपिटलकडून इंटरेस्ट व्यक्त करण्यासाठी आमंत्रित आंमत्रित करण्यात आले होते.
अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलसाठी बोलीदारांकडे दोन पर्याय देण्यात आले आहेत. पहिला पर्याय म्हणजे संपूर्ण कंपनीसाठी (रिलायन्स कॅपिटल लिमिटेड) बोली लावणे, या कंपनींतर्गत एकूण आठ उपकंपन्या येत आहेत. बोलीदार यापैकी एक किंवा अधिक कंपन्यांसाठी देखील बोली लावू शकतात असे सांगण्यात आले आहे..
रिलायन्स कॅपिटलच्या उपकंपन्यांमध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स, रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स, रिलायन्स सिक्युरिटीज, रिलायन्स अॅसेट रि-कन्स्ट्रक्शन कंपनी, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपन्यांचा समावेश त्यामध्ये आहे.
रिलायन्स कॅपिटलने आपल्या सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना सांगितले होते की कंपनीवरील एकूण कर्ज 40 हजार कोटींचे आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा तोटा 1759 कोटी रुपयांवर आला होता. तर डिसेंबर 2020 च्या तिमाहीत कंपनीचा एकूण तोटा 3966 कोटी रुपये होता. तोट्यात गेलेल्या या कंपनीची स्थापना 1986 मध्ये झाली होती.
संबंधित बातम्या
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताय? वेळीच समजून घ्या धोके, अन्यथा गुंतवलेला पैसा ठरेल डोकेदुखी!
चालू आर्थिक वर्षात खताच्या सबसिडीमध्ये होणार मोठा बदल; रशिया आणि युक्रेन युद्धाचा थेट शेतीवर परिणाम