नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : गेल्या एका वर्षात काही कंपन्यांनी मोठी घौडदौड केली आहे. बाजारात तेजी मंदीचे सत्र सुरु असतानाही या कंपन्यांवर त्याचा मोठा परिणाम झाला नाही. ऑर्डर मिळाल्याने या कंपन्यांचे काम वाढले. त्यांचा महसूल आणि नफा वाढला. गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवला. या कंपनीने पण गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होऊ दिला नाही. या कंपनीचा शेअर एका वर्षात 500 टक्क्यांनी वधारला आहे. आता कंपनीने एका शेअरचे 5 तुकडे (Share Split) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. त्यामुळे हा शेअर खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कंपनीची कामगिरी जोरदार असल्याने गुंतवणूकदारांचे या घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
कधी आहे रेकॉर्ड डेट
तर Geekay Wires ने हा करिष्मा केला आहे. शेअर बाजाराला कंपनीने शेअर स्प्लिटची माहिती दिली आहे. 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या एका शेअरला 5 तुकड्यात वाटण्यात येईल. या कंपनीचे फेस व्हॅल्यून कमी होऊन 2 रुपये होईल. कंपनीने या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट 23 ऑक्टोबर 2023 ही निश्चित केली आहे. गेल्या महिन्यात या कंपनीने गुंतवणूकदारांना एका शेअरवर 2.70 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.
घोषणेनंतर शेअरला अप्पर सर्किट
गुरुवारी कंपनीच्या शेअरला सलग तिसऱ्या दिवशी अप्पर सर्किट लागले आहे. त्यानंतर एका शेअरची किंमती 362.70 रुपयांच्या स्तरावर पोहचली. सलग तीन दिवसांच्या व्यावसायिक सत्रात कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागले आहे. गेल्या 6 महिन्यात Geekay Wires च्या शेअरची किंमती 102 टक्क्यांनी वधारली आहे. हा शेअर मोठी झेप घेण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अशी आहे कामगिरी
कंपनीने या आर्थिक वर्षात आतापर्यंत 101.30 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. गेल्या आर्थिक वर्षांत हा आकडा 88.22 कोटी रुपये होता. जून 2023 पर्यंत कंपनीला 8.32 कोटी रुपयांचा नफा झाला. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 2.58 कोटींचा फायदा झाला होता. गीक वायर्सने 52 आठवड्यात 362.70 रुपयांचा उच्चांक गाठला होता. या 12 ऑक्टोबर रोजी हा रेकॉर्ड झाला. तर कंपनीचा 52 आठवड्यातील निच्चांक 54.70 रुपये होता. गेल्या वर्षी 18 ऑक्टोबर रोजी ही निच्चांकी कामगिरी केली होती. गेल्या पाच वर्षांत या मल्टिबॅगर शेअरने 867.20 टक्के परतावा दिला.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.