मुंबई: अलीकडच्या काळात औषधांच्या खरेदीच्यानिमित्ताने अनेकदा Generic Aadhaar हे नाव तुमच्या कानावर पडत असेल. या कंपनीची फ्रेंचायजी सुरु केल्यास तुम्हाला चांगले पैसे कमावता येऊ शकतात. सध्या मेडिकल चालवणाऱ्या व्यवसायिकांनाही Generic Aadhaar ची फ्रेंचायजी सुरु करता येते.
इतर औषध कंपन्यांच्या फ्रेंचायजीसमध्ये तुम्हाला 15 ते 20 टक्के मार्जिन मिळते. मात्र, Generic Aadhaar ही कंपनी फ्रेंचायजी चालवणाऱ्यांना तब्बल 40 टक्के मार्जिन देते. Generic Aadhaar च्या औषधांच्या किंमती कमी असल्याने त्यांचा खपही जास्त असतो. याशिवाय, कंपनीकडून टेक्निकल सपोर्ट, लोकल ऑनलाईन ऑर्डर अशा सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. सध्याच्या घडीला Generic Aadhaar जवळपास 700 प्रकारची जेनेरिक औषधे विकते.
Generic Aadhaar च्या संकेतस्थळावर गेल्यास Business Opportunity असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यास फ्रेंचायजी घेण्यासाठीचा फॉर्म मिळेल. याठिकाणी आपले नाव, मोबाईल नंबर, पत्ता, शहराचे नाव, ईमेल आयडी असा सर्व तपशील भरावा लागतो. याशिवाय, तुम्ही संकेतस्थळावर नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधूनही फ्रेंजायजीची माहिती मिळवू शकता.
भारतात 30 हजार रिटेल आऊटलेट उघडण्याचे लक्ष्य कंपनीने डोळ्यांसमोर ठेवले आहे. प्रत्येक शहरात कंपनीची 100 दुकाने असतील, अशी योजना आहे. Generic Aadhaar च्या दुकानांमध्ये जवळपास 1000 औषधांची विक्री केली जाते. या माध्यमातून देशातील गरीब नागरिकांना माफक दरात औषधे उपलब्ध होतात. आतापर्यंत देशातील 18 राज्यांमध्ये Generic Aadhaar च्या फ्रेंचायजी सुरु झाल्या आहेत.
भारतात सध्याच्या घडीला Generic Aadhaar कंपनीला विशेष स्पर्धा नाही. त्यामुळे आगामी काळात या कंपनीचा व्यवसाय वेगाने वाढेल, असा अंदाज आहे. 2018 साली ठाण्यातील अर्जुन देशपांडे या तरुणाने Generic Aadhaar च्या स्टार्टअपची संकल्पना मांडली होती. ही संकल्पना उद्योगपती रतन टाटा यांना भावली. त्यामुळेच रतन टाटा यांनी Generic Aadhaar कंपनीत मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक केली आहे.
संबंधित बातम्या:
20 वर्षांनंतर दर महिना 1.5 लाख रुपये कमवायचेत? जाणून घ्या किती गुंतवणूक करणं गरजेचं
SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी चांगली बातमी, बँक घरी 20000 रुपयांपर्यंत रोकड पाठवणार, पण कशी?
PM Kisan Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के सबसिडी, फायदा कसा मिळवायचा ते जाणून घ्या