Gold and Silver Price : सोने तब्बल 6700 रुपयांनी स्वस्त तर चांदी 13000 रुपयांनी स्वस्त

| Updated on: Jul 26, 2024 | 9:30 PM

केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 6 टक्क्यांनी कमी केली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. सोने-चांदीचा आजचा दर पाहिला तर सोन्याच्या किंमतीत तब्बल 6700 रुपये प्रति 10 ग्रॅम घट झाली आहे.

Gold and Silver Price : सोने तब्बल 6700 रुपयांनी स्वस्त तर चांदी 13000 रुपयांनी स्वस्त
दुबईमध्ये एक वर्षाहून अधिक काळ वास्तव्य केलेली मुले दुबईतून करमुक्त सोन्याचे दागिने भारतात आणू शकतात. पण बिस्किटे किंवा बार खरेदी करून घेऊन जाता येणार नाही. त्यांना फक्त सोन्याच्या स्वरूपात दागिने खरेदी करावे लागतील.
Follow us on

भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांना एक वेगळं महत्त्व आहे. लग्न सराईत असेल किंवा इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये सोन्याचे आभूषण परिधान केले जातात. याशिवाय सोने आणि चांदीची किंमत कमी असताना त्यांची खरेदी करुन गुंतवणूक करणं खूप फायदेशीर ठरतं. कारण सोने आणि चांदीचे दर एकदा वाढायला लागले की गगनाला भिडतात. याशिवाय भारतीय समाजात सोने आणि चांदीला एक वेगळं महत्त्वं आहे. त्यामुळे तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करतात तर तुमच्यासाठी ही अतिशय योग्य वेळ आहे. कारण सोनेच्या दरात तब्बल 6700 रुपयांची घट झाली आहे. तर चांदीच्या दरात 13000 हजार रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीमधील गुंतवणुकीची ही संधी सोडू नका, असा जाणकरांचा सल्ला आहे.

सोने-चांदीच्या दरात चांगलीच घट झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किंमतीमध्ये सातत्याने घट होताना दिसत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 6 टक्क्यांनी कमी केली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. सोने-चांदीचा आजचा दर पाहिला तर सोन्याच्या किंमतीत तब्बल 6700 रुपये प्रति 10 ग्रॅम घट झाली आहे. तर चांदीचा भाव हा प्रति किलो 13000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. इतकं स्वस्त सोनं-चांदी याआधी कधी झालं नव्हतं. त्यामुळे सोने-चांदीचा खरेदीचा विचार करत असाल तर ही वेळ अतिशय योग्य आहे.

सोने-चांदीमध्ये कशी गुंतवणूक करावी?

जाणकरांच्या मते, तुम्ही गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगला विचार आहे. पण एकदाच सर्व सोने खरेदी करु नका. तर टप्प्याटप्प्याने थोडे-थोडे सोने खरेदी करा, असं जाणकारांचं म्हणणं आहे. कारण सोन्याच्या किंमतीत सध्या चांगली घट झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होत आहे. त्यामुळे तुम्ही सोन्यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सध्या 40 हजार रुपयांची गुंतवणूक करा. उर्वरित 60 हजार रुपयांची सोन्याची खरेदी ही सोन्याचा दर आणखी स्वस्त झाल्यावर करु शकता. याचा फायदा आगामी काळात होणारच आहे. कारण सोन्याचा दर नेहमीच बसून राहत नाही. याउलट सोन्याच्या दरांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली तर ती वाढ झपाट्याने होते. त्यामुळे सध्याच्या घडीला सोने खरेदीत गुंतवणूक करणं जास्त फायदेशीर ठरणारं आहे.

सोने-चांदीचे आजचे दर किती?

सोन्याचा आजचा भाव सांगायचा तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 68131 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 62408 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. तर चांदीचा दर हा सध्या 81271 रुपये प्रति किलो असा आहे. 24 कॅरेट सोन्याचा कालचा (25 जुलै) दर हा 68227 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. हाच दर आज घटून 62408 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. तर चांदीचा भाव हा 81474 रुपये प्रति किलो होता. चांदीच्या किंमतीतही आज घट होत 81271 रुपये प्रति किलोवर दर आला आहे.