नवी दिल्ली : चालू आठवड्यात शेअर बाजारामध्ये काहीसे नकारात्मक वातावरण राहिल्याचे दिसून आले. सेन्सेक्समध्ये मोठ्याप्रमाणात घसरण झाली. मात्र दुसरीकडे या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमतीमध्ये तेजी आली. कमोडिटी मार्केटनुसार या आठवड्यात सोन्याचे दर प्रति सोळा 500 रुपयांनी वधारले, तर चांदीच्या दरामध्ये देखील प्रति किलो 900 रुपयांची वाढ झाली. तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत.
कमोडिटी मार्केटनुसार चालू आठवड्यामध्ये 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47816 रुपयांवरून 48384 रुपयांवर पोहोचले म्हणजे त्यामध्ये प्रति तोळा 568 रुपयांची वाढ झाली आहे . तर चांदीचे दर प्रति किलो 60155 रुपयांवरून 61071 वर पोहोचले याचाच अर्थ या आठवड्यात चांदीच्या दरात प्रति किलो 916 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र त्याच्या आधीच्या आठवड्यामध्ये सोन्या, चांदीचे दर काहीप्रमाणात घसरल्याचे पहायला मिळाले होते.
सध्या जगभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने धुमाकूळ घातला आहे. भारतामध्ये देखील ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. ओमिक्रॉनच्या सावटाचा परिणाम हा कच्च्या तेलाच्या किमतीवर झाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चालू आठवड्या कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. कच्च्या तेलाचे दर 75.15 डॉलर प्रति बॅरलवरून कमी होऊन 73.52 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. म्हणजेच चालू आठवड्यामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये दोन टक्क्यांची घट झाली आहे.
जेट एअरवेज पुन्हा एकदा उड्डानासाठी सज्ज; काय आहे कंपनीची भविष्यातील रणनिती?