गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव कोसळल्यानं घरेलू बाजारातही सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. गुरुवारी एमसीएक्सवर सोनं आणि चांदीची किंमत सलग तिसऱ्या दिवशी कोसळली आहे.
डिसेंबरच्या सुरुवातीला आलेला सोन्याचा वायदा भाव घसरत 49,971 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला होता. एक दिवस आधी म्हणजे बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात 10 ग्रॅम सोनं 694 रुपयांनी स्वस्त झालं.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात विक्रमी घट झाली असून सोन्याचा भाव 50 हजार रुपयांवर आला आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंमती आणखी घसरू शकतात. पण दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमती मोठ्या झपाट्याने वाढतील. दिवाळीपर्यंत सोनं 50000-52000 रुपये प्रति 10 ग्रॅम होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातून मदतीच्या पॅकेजवर स्वाक्षरी केल्याचं म्हटलं आहे. यानंतर जगभरात शेअर बाजारात भाव जोरदार गडाडले आहेत. कारण, अमेरिका जगातली सगळ्या मोठी अर्थव्यवस्था आहे. जर तिथे वस्तूंवर चांगल्या किंमती राहिल्या तर जगभरात त्याचा फायदा होतो. त्यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्याकडे कल कमी झाल्याचं पाहायला मिळतं.
जेव्हा अर्थव्यवस्था कमकुवत होते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात आणि जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असते तेव्हा सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण होते.
जागतिक बाजारात, आज मौल्यवान धातूंमध्ये चांदी 23.83 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिली, प्लॅटिनम 0.1% टक्क्यांनी 865.21 डॉलरवर तर पॅलिडेयम 2,352.18 डॉलरवर स्थिर राहिलं.