Gold Import Limit: परदेशातून किती सोनं आणता येते जाणून घ्या काय आहे नियम

| Updated on: Sep 17, 2024 | 6:47 PM

जगातील अनेक देशांमध्ये सोने भारतापेक्षा स्वस्त आहे, त्यामुळे अनेक जण परदेशातून सोने आणण्याचा विचार करतात. आता परदेशातून सोने आणण्यासाठी मर्यादा घालण्यात आली आहे. मर्यादेपेक्षा जास्त सोने आणल्यास सीमाशुल्क भरावे लागते. या लेखात परदेशातून सोने आणण्यासाठी किती सीमाशुल्क लागते ते जाणून घेऊ.

Gold Import Limit: परदेशातून किती सोनं आणता येते जाणून घ्या काय आहे नियम
सोने आणि चांदी किंमत
Follow us on

भारतात सोन्याला प्रचंड महत्त्व आहे. सोन्याच्या दरात दररोज चढ-उतार होत असतात. भारताच्या तुलनेत इतर काही देशांमध्ये सोनं स्वस्त मिळतं. परदेशातील सोन्याच्या किमतींबाबत तुम्ही ऐकले असेल की, दुबईमध्ये सोने स्वस्त मिळते. अशा परिस्थितीत आपण परदेशातून किती सोने आणू शकतो, हा प्रश्न रास्त आहे. आज आम्ही तुम्हाला याबाबत काय नियम आहेत ते सांगणार आहोत. भारतात सोने आणण्यासाठी मर्यादा आहेत. मर्यादेपेक्षा जर तुम्ही जास्त सोने आणले तर तुम्हाला त्याचे शुल्क भरावे लागते. नियमांनुसार, कोणतीही भारतीय व्यक्ती एका वर्षात केवळ 50,000 रुपये किमतीचे 20 ग्रॅम दागिने आणू शकते. जर एखादे मूल एक वर्षापेक्षा जास्त काळ परदेशात राहिले तर त्याला सोन्याच्या मर्यादेत अतिरिक्त मर्यादा मिळते.

किती सीमाशुल्क भरावे लागेल?

अनेक जण आपण ऐकलं असेल की, एअरपोर्टवर सोन्याची तस्करी करताना पकडले गेले. यामध्ये कडक शिक्षा होते. त्यामुळे सोनं आणताना काळजी घेतली पाहिजे. केवळ सोन्याच्या दागिन्यांवरच शुल्कमुक्त भत्ता लागू आहे. जर भारतीय प्रवाशाने परदेशातून सोन्याचे बिस्कीट, नाणी आणि इतर दागिने आणले, तर त्यांच्या किंमतीनुसार सीमाशुल्क आकारले जाते.

सोन्याच्या वजनानुसार किती आकारणी होते?

1 किलोपेक्षा कमी वजनाच्या सोन्याच्या बिस्किटांवर 10 टक्के सीमा शुल्क आकारले जाते.
20 ग्रॅम ते 100 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बिस्किटांवर 3 टक्के सीमा शुल्क आकारले जाते.
20 ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या सोन्याच्या पट्ट्यांवर सीमाशुल्क नाही.
20 ग्रॅम ते 100 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या नाण्यांवर 10 टक्के शुल्क आहे.
20 ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या सोन्याच्या नाण्यांवर सीमा शुल्क नाही.
जर प्रवाशांनी 20 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे आणि 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचे सोन्याचे दागिने आणले तर त्यावर कोणतेही सीमाशुल्क आकारले जात नाही.

ही गोष्टी लक्षात ठेवा

परदेशातून सोने आणण्यापूर्वी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. म्हणजे जसे की, खरेदीची पावती. सोने आणताना काळजी घ्यावी. तुम्ही सोनं आणतांना काळजी घेतली पाहिजे. कोणती गोष्ट जर नियमांचं उल्लंघन करत असेल तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.