नवी दिल्ली : भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. मंगळवारीही सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रचंड घसरण झाली. आज सोन्याच्या किंमती 100 ग्रॅम प्रति 1,200 रुपयांनी कमी झाल्याचे दिसून आले, म्हणजेच प्रति 10 ग्रॅम 120 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. जागतिक निर्देशांदरम्यान भारतात सलग दुसर्या दिवशी सोन्याच्या किंमती खाली आल्या. एमसीएक्सवर सोन्याचे वायदा दर 10 ग्रॅम 0.24 टक्क्यांनी घसरून 44,795 वर, तर चांदी 0.5% खाली घसरून 66,013 प्रती किलो झाली. मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर 0.18% तर चांदी 1.6% खाली घसरली. (gold price today 23 march 2021 fall check gold latest rates)
सोन्याच्या किंमती (Gold Rates)
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 100 ग्रॅम 4,38,000 रुपये आणि दिल्ली सराफा बाजारात प्रति 10 ग्रॅम 43,800 रुपये आहेत. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 100 ग्रॅम 4,47,950 रुपये आणि प्रति 10 ग्रॅम 44,795 रुपये आहे. सोमवारी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 302 रुपयांची घट झाली होती.
चांदीच्या किंमती (Sliver Rate)
मंगळवारी चांदीच्या भावातही किंचित घट नोंदली गेली. सराफा बाजारात चांदीचा दर आज 66,013 रुपये प्रतिकिलोवर आला. सोमवारी चांदीच्या किंमती 1.6 टक्क्यांनी घसरल्या.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या किंमती
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 0.3% घसरून 1,733.69 डॉलर प्रति औंस. अन्य मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.6% टक्क्यांनी घसरून 25.61 डॉलर आणि प्लॅटिनम 0.3% खाली घसरून 1,179.59 डॉलरवर बंद झाली.
सोनं का झालं स्वस्त?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, या आठवड्यात व्यवसाय आणि गुंतवणूकदारांचं लक्ष अमेरिकन बाँडकडे आहे. यामुळे सोमवारी सोन्याच्या दरावर दबाव होता. अमेरिकन बाँडचे उत्पन्न आणि मजबूत डॉलरमुळे सोन्याच्या विक्रीचा व्यापार पाहायला मिळाल.
सोन्याची आयात कमी झाली
चालू आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या 11 महिन्यांमध्ये (एप्रिल-फेब्रुवारी) सोन्याची आयात (Gold Import) 3.3 टक्क्यांनी घसरून 26.11 अब्ज डॉलरवर गेली. आकडेवारीनुसार सोन्याच्या आयातीतील कपातीमुळे देशातील व्यापार तूट कमी होण्यास मदत झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत व्यापार तूट 84.62 अब्ज डॉलर्सवर गेली, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 151.37 अब्ज डॉलर्स होती. (gold price today 23 march 2021 fall check gold latest rates)
संबंधित बातम्या –
अडाणी ग्रीन एनर्जीने रचला इतिहास! पहिल्यांदाच 1 वर्षात 870 टक्के वाढले शेअर्स
Loan Moratorium प्रकरणात आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण?
पैशांची कमी असेल तर घर बसल्या कमवू शकता पैसे, वाचा 5 बिझनेस आयडिया
(gold price today 23 march 2021 fall check gold latest rates)