नवी दिल्ली : दिवाळीच्या खरेदीमुळे आज म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात घट झाली. दिल्ली सराफा बाजारात आज म्हणजेच 3 नोव्हेंबर 2021 रोजी सोन्याची किंमत 46,411 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहोचली. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,786 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदीचा भाव 62,950 रुपये प्रति किलोवर बंद झाला.
HDFC सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, बुधवारी सोन्याचा भाव 375 रुपयांनी घसरून 46,411 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील व्यवहारात सोन्याचा भाव 46,786 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा भावही 898 रुपयांनी घसरून 62,052 रुपये प्रतिकिलो झाला.
सप्टेंबर 2021 मध्ये रत्ने आणि दागिन्यांची निर्यात 29.67 टक्क्यांनी वाढून 23,259.55 कोटी रुपये झाली. वर्षभरापूर्वी याच महिन्यात हा आकडा 17,936.86 कोटी रुपये होता. त्याच वेळी सप्टेंबर 2019 मध्ये 23,491.20 कोटी रुपयांची रत्ने आणि दागिन्यांची निर्यात झाली. अलीकडे जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) ने एका निवेदनात म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत एप्रिल-सप्टेंबरमध्ये हिरे आणि दागिन्यांची निर्यात मागील याच कालावधीच्या तुलनेत 134.55 टक्क्यांनी वाढली आहे आणि ती आर्थिक वर्ष 1,40,412.94 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता, यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यात तुम्ही नवीन दर पाहू शकता.
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलेय. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.
संबंधित बातम्या
कोटक सिक्युरिटीजचं छोट्या गुंतवणूकदारांना गिफ्ट, आता मोफत व्यवहार करता येणार