नवी दिल्ली : सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. अशात आता सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्यामुळे सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. सोन्याच्या (Gold price today) आणि चांदीच्या आजच्या किंमतींबद्दल (Silver Price Today) विचार करायचा झाला तर आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchnage) सोन्याच्या किंमती खूप घसरल्याचं पाहायला मिळतं. आज, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 44,897 रुपये आहे. त्याचबरोबर चांदीची किंमतही सुमारे 0.16 टक्क्यांनी घसरून 65140 रुपयांच्या पातळीवर आली आहे. याखेरीज सोन्याच्या चांदीमध्ये गेल्या व्यापार सत्रात 0.45 टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. (gold price today gold silver price down in mcx on 25 march 2021 gold rates)
जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे आज सोन्याचे दर घसरल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिकन बाजारात आज स्पॉट सोन्याचे दर प्रति औंस 1,734.81 डॉलरवर स्थिर राहिला.
24 कॅरेट सोन्याची किंमत
देशातील महानगरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत काय आहे जाणून घेऊयात. आज दिल्लीमध्ये 24 कॅरेटची किंमत प्रति 10 ग्रॅम 48070 रुपये आहे. तर चेन्नईमध्ये 46150 रुपये, मुंबईत 45030 रुपये आणि कोलकातामध्ये प्रति 10 ग्रॅम 46880 रुपये आहेत.
आतापर्यंत 11500 रुपयांनी स्वस्त झाले सोने
गेल्या काही महिन्यांत सोने 11500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. कोरोना संकटात ते 55 हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना लस लागू झाल्यापासून सोन्याच्या किंमती सतत खाली आल्या आहेत. लसीकरणानंतर आर्थिक क्रियेत वेग वाढण्याची अपेक्षा आहे.
तज्ज्ञांचे मत आहे की, 2021 मध्ये सोन्याच्या किंमती निश्चितच वाढतील. यावर्षी सोन्याचे दर 63,000 च्या पातळीवर जाईल असा अंदाज आहे. जर असे झाले तर गुंतवणूकदारांना जोरदार नफा मिळण्याची खात्री आहे.
दिल्ली सराफा बाजाराचे दर
बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये प्रति 10 ग्रॅम 149 रुपयांची किंचित घट झाली, त्यानंतर सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 44,499 रुपयांवर पोचले. त्याचबरोबर चांदी 64,607 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली.
सोन्याची आयात कमी झाली
चालू आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या 11 महिन्यांमध्ये (एप्रिल-फेब्रुवारी) सोन्याची आयात 3.3 टक्क्यांनी घसरून 26.11 अब्ज डॉलरवर गेली. आकडेवारीनुसार सोन्याच्या आयातीतील कपातीमुळे देशातील व्यापार तूट कमी होण्यास मदत झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत व्यापार तूट 84.62 अब्ज डॉलर्सवर गेली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 151.37 अब्ज डॉलर्स होती. (gold price today gold silver price down in mcx on 25 march 2021 gold rates)
संबंधित बातम्या –
LPG Gas Cylinder : 819 रुपयांचा सिलेंडर फक्त 119 रुपयांत मिळवा, वाचा संपूर्ण प्रोसेस
विमाधारकांसाठी Good News! नियम आवडले नाही तर खरेदी केलेली पॉलिसी करू शकता रद्द, वाचा सविस्तर
Ration Card : रेशनकार्डसाठी अतिशय महत्त्वाचं आहे हे डॉक्यूमेंट, तुम्हीही ‘असं’ करा अल्पाय
(gold price today gold silver price down in mcx on 25 march 2021 gold rates)