नवी दिल्ली : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price) चांगल्याच उंचावल्या आहेत. सोमवारी MCX वर फेब्रुवारीच्या वायदा सोन्यामध्ये (Gold) मोठ्या बढतीनं व्यवसाय सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याच्या किमतींमध्ये 1 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवली गेली आहे. तर चांदीचे (Silver) भाव 4 टक्क्यांनी वाढले आहेत. (gold price today gold trades higher and silver rise up to 4 percent on mcx)
अधिक माहितीनुसार, MCX वर सोनं (Gold Price) 1.13 टक्क्यांनी म्हणजेच 566 रुपयांनी वाढत 50,831 रुपयांवर पोहोचलं आहे. तर चांदी (Silver Price) 4 टक्क्यांनी म्हणजेच 2,733 रुपयांनी वाढत 70,567 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचलं आहे.
का वाढले सोने-चांदीचे भाव?
जागतिक बाजारपेठेत होणाऱ्या घडामोडींमुळे सोन्याचे दर वाढले आहेत. अमेरिकेच्या आर्थिक पॅकेजचाही इधनांच्या किंमती वाढींवर मोठा परिणाम झाला आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकी काँग्रेस नेते हे 900 अब्ज डॉलर्स पॅकेजच्या करारावर सहमत झाले असून पुढच्या महिन्यात हे आर्थिक पॅकेज दिलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या मोठ्या घोषणेमुळे सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.
मागच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये तेडी आल्याचं पाहायला मिळालं होतं. यावेळी सोन्याचे भाव 1,900 डॉलर प्रति औंसवर तर चांदीचे भाव 26 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते.
सोन्याची आयात 8 महिन्यांत घटली
देशामध्ये सोन्याची आयात (Gold Import) चालू आर्थिक वर्षात एप्रिल-नोव्हेंबरच्या दरम्यान, 40 टक्क्यांनी घसरत 12.3 अब्ज डॉलरवर पोहोचली होती. कोव्हिड-19 च्या जीवघेण्या संसर्गामध्ये (COVID-19 Pandemic) सोन्याच्या मागणीत कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळालं. वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या आकड्यांनुसार, मागच्या आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये मौल्यवान धातूंची आयात 20.6 अब्ज डॉलर इतकी होती. चांदीची आयात चालू आर्थिक वर्षामध्ये एप्रिल-नोव्हेंबर दरम्यान, 65.7 टक्क्यांनी घसरत 75.2 कोटी डॉलरवर पोहोचली. (gold price today gold trades higher and silver rise up to 4 percent on mcx)
संबंधित बातम्या –
आता पण चालू शकते 1, 2 आणि 5 रूपयांची नोट? जर तुमच्या जवळ या नोटा असतील तर पाहा नियम
1 जानेवारीपासून बदलणार हे 10 नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम
सोलापूरमधून मुंबईला येणारे तीन कोटी रुपयांचे सोने जप्त, चालकाच्या सीटामुळे संपूर्ण प्रकार उघडकीसhttps://t.co/LDX7wvKVy9
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 14, 2020
(gold price today gold trades higher and silver rise up to 4 percent on mcx)