Gold Price: दोन दिवसांत 1000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा आजचे नवे दर

| Updated on: Oct 15, 2020 | 2:08 PM

अमेरिकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांआधी काही अनुदानपर घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत.

1 / 9
gold silver latest rate

gold silver latest rate

2 / 9
एमसीएक्सवर, आज सुरुवाती बाजारात डिसेंबरच्या सोन्याचा वायदा भाव 0.4 टक्क्यांनी कमी होत 50,360 प्रति 10 ग्रॅमवर आला आहे तर डिसेंबरच्या चांदीचा वायदा भाव 0.9 टक्क्यांनी घसरत 61,064 प्रति किलोग्रॅमवर आला आहे.

3 / 9
मागच्या सत्रात सोन्यामध्ये 0.5 टक्क्यांनी घसरण झाली आहे चांदीने 1.6 टक्क्यांनी उडी घेतली आहे.

4 / 9
जागतिक बाजारात, आज सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकी डॉलरमुळे आज सोन्यावर दबाव होता.

5 / 9
डॉलर इंडेक्स 93.435 च्या उच्च स्तरावर पोहोचला आहे. परदेशी बाजारात सोनं 0.4 टक्क्यांनी घसरून 1,893.17 डॉलर प्रति औंसवर गेलं आहे. तर इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 1 टक्क्यांनी घसरत 24.05 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.  प्लॅटिनम 0.3 टक्क्यांनी घसरत 854.59 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे.

6 / 9
मोतीलाल ओसवाल फायनेंशिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सोनं डिसेंबरच्या वायदा भावात 50,100 रुपयांनी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

7 / 9
49,900 रुपयांवर स्टॉपलॉस ठेवा आणि एक ते दोन सत्रांमध्ये 50,700 रुपये प्रति 10 ग्रॅम असं सोनं खरेदी करा.

8 / 9
चांदीही डिसेंबरच्या वायदा भावामध्ये 60,750 रुपये दराने खरेदी करा. 60,200 रुपयांवर स्टॉपलॉस लावा आणि दोन सत्रांमध्ये 61,900 रुपयांनी चांदी खरेदी करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

9 / 9
दरम्यान, आता सोन्याचे भाव जरी कमी असले तरी दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमती मोठ्या झपाट्याने वाढतील. दिवाळीपर्यंत सोनं 50000-52000 रुपये प्रति 10 ग्रॅम होण्याची शक्यता आहे.