मुंबई: गुरुवारी सोन्याच्या दरात (Gold prices) घसरण झाली. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 850 रुपये इतके आहेत. तर दुसरीकडे 10 ग्रॅम मागे 24 कॅरेट सोन्याचा भाव बुधवारी ट्रेडिंग किमतीपेक्षा (trading price) घसरुन तो गुरुवारी 51110 रुपयांवर त्याची विक्री झालेली दिसून आली. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास चांदीचे (silver) दर गुरुवारी एका किलोमागे तब्बल 57 हजार नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात किरकोळ वाढ होताना दिसून आली आहे. दरम्यान, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर, मुंबई, दिल्ली, कोलकाता, आणि बंगळुरू आदी ठिकणी 46 हजार 850, तर चेन्नईला 46 हजार 720 आणि जयपूर व लखनऊला हेच भाव 47 हजार रुपये इतके आहेत.
चांदीबाबत बोलायचे झाले तर, मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि पुण्यात एक किलो चांदीचे भाव 57 हजार रुपयांच्या घरात आहेत. तर बंगळुरू, चेन्नई आणि हैद्राबादमध्ये याच चांदीचे दर तब्बल 62 हजार 400 रुपये प्रति किलो इतके आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरांमध्ये स्थिरता येईल असे चित्र होते. दागिन्यांच्या मजुरीत करण्यात आलेली वाढ, महागाईचा दर, राज्याचा कर, एक्साईड ड्युटी, घडणावळीवरील कर आदींचा परिणाम हा सराफा मार्केटवर मोठ्या प्रमाणात होत असतो. त्याचप्रमाणे डॉलरच्या तुलनेत सतत घसरण होत असलेल्या रुपयामुळेही सोन्या चांदीच्या भावामध्ये अस्थिरता निर्माण झालेली दिसून येत आहे.
दरम्यान, सोन्याच्या दरात घट झाली असली तरी चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. शहरानूसार चांदीच्या दरात भिन्नता दिसून येत आहे. 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीची किंमत 56583 रुपयांवर पोहोचली आहे.सोन्या-चांदीच्या किमती रोज बदलतात. 24 कॅरेट शुद्ध सोने 427 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर 22 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 426 रुपयांनी खाली आला आहे.
आज दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46850 रुपये असून, चांदीचा दर प्रति किलो 57000 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46850 रुपये आहे, तर चांदीचा दर 57000 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46850 रुपये इतका तर चांदीचा दर 57000 रुपये एवढा आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46720 रुपये असून चांदीचा दर प्रति तोळा 62400 रुपये एवढा आहे.