मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एका विशिष्ट मर्यादेत वरखाली होत असलेले सोन्याच्या किंमतीत मंगळवारी किंचीत वाढ पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सेंजवर (MCX) 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 120 रुपयांनी वाढली. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 1200 रुपयांनी वाढला. त्यामुळे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे प्रतितोळा 46400 आणि 47400 रुपये इतकी झाली. (Gold price on MCX)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने भारतीय वायदा बाजारात त्याचे पडसाद उमटले होते. सोमवारी मल्टी कमोजिटी एक्स्चेंज मार्केटमध्ये (MCX) आज सोने (Gold) 23 रुपयांनी वधारून 47308 च्या स्तरावर जाऊन पोहोचले. तर चांदीच्या किंमतीमध्येही तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे चांदीचा प्रतिकिलो भाव 382 रुपयांनी वाढून 69500 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता.
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव असून सोने 47 हजारांच्या खाली आले आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या उदयानंतर सोन्याचे भाव (Gold rates) पुन्हा वर जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जाणकारांकडून सोन्याचा दर आणखी खाली आल्यास खरेदीचा सल्ला दिला जात आहे.
सध्या सोन्याचा दर हा दोन महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. मल्टी कमोडिटी एक्सेंजमध्ये सोन्याच्या किंमतीला 46500 रुपयांच्या पातळीवर भक्कम सपोर्ट आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा प्रतितोळा दर 46,615 इतका होता. त्यामुळे सोन्याचा दर सपोर्ट प्राईसच्या अत्यंत जवळ आहे. या पातळीपर्यं पोहोचल्यानंतर सोन्याच्या किंमती पुन्हा वरच्या दिशेने प्रवास सुरु करतील. अशातच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे अनिश्चिततेच्या वातावरणात आणखी भर पडली आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याच्या किंमती 52 हजाराचा टप्पा गाठतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.
संबंधित बातम्या:
BISच्या वेबसाईटवर हॉलमार्किंगची माहिती गायब; व्यापाऱ्यांनी ‘या’ केंद्रीय मंत्र्याला पाठवले पत्र
Gold Hallmarking च्या नियमांविषयी संभ्रमाचे वातावरण, व्यापारी नाराज
Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका
(Gold price on MCX)