GLOD RATE TODAY: महाराष्ट्रात सोन्याच्या भावात घसरण, 400 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या-आजचे भाव

| Updated on: Feb 25, 2022 | 5:37 PM

आज (शुक्रवारी) महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या (MAJOR CITIES GOLD RATE) भावात सरासरी 400 रुपयांची घसरण नोंदविली गेली. मुंबईत (MUMBAI GOLD RATE) 22 कॅरेट सोन्याला 46850 व 24 कॅरेट सोन्याला 51110 रुपये भाव मिळाला.

GLOD RATE TODAY: महाराष्ट्रात सोन्याच्या भावात घसरण, 400 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या-आजचे भाव
आजचे सोन्याचे दर
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई- आंतरराष्ट्रीय बाजारातील अर्थघडामोडींचा थेट परिणाम सोन्याच्या खरेदी-विक्रीवर दिसून आला. रशिया-युक्रेन संकटाच्या (RUSSIAN-UKRANE CRISIS) दबावात गुंतवणुकदारांनी सोन्याकडं मोर्चा वळविला होता. सुरक्षित गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग म्हणून सोन्याला पसंती दिल्यानं मुंबई, नागपूर, नाशिक व पुण्यात सोन्याच्या भावानं पन्नास हजारांचा टप्पा पार केला होता. आज (शुक्रवारी) महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या (MAJOR CITIES GOLD RATE) भावात सरासरी 400 रुपयांची घसरण नोंदविली गेली. मुंबईत (MUMBAI GOLD RATE) 22 कॅरेट सोन्याला 46850 व 24 कॅरेट सोन्याला 51110 रुपये भाव मिळाला. गेल्या आठवड्याभरापासून सोन्याच्या भावात तेजी-घसरणीचं चित्र दिसून येत आहे. आगामी काळात चित्र सुस्पष्ट होईपर्यंत भाव दोलायमानच राहणार असल्याचा निष्कर्ष आर्थिक जाणकरांनी व्यक्त केला आहे. देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव-

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर (प्रति तोळे) :

• मुंबई- 51,110 रुपये (440घट)
• पुणे- 51,200 रुपये (400घट)
• नागपूर- 51,250 रुपये (350घट)
• नाशिक- 51,200 रुपये (400घट)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर (प्रति तोळे):

• मुंबई- 46,850 रुपये (400 घट)
• पुणे- 46,900 रुपये (400 घट)
• नागपूर- 46,980 रुपये ( 320घट)
• नाशिक- 46,900 रुपये (400 घट)

सोनं खरेदीची हीच वेळ?

युक्रेन-रशिया वादामुळं शेअर बाजारासह सुवर्ण बाजाराला मोठा फटका बसला आहे. दोलायमानं बाजाराच्या अवस्थेमुळं गुंतवणुकदारांना कोट्यावधी रुपयांवर पाणी सोडावे लागत आहे. सोने गुंतवणुकदारही धास्तावले आहेत. तेजी-घसरणीच्या आलेखामुळं सोने-बाजार स्थिर होण्याच्या प्रतीक्षेत गुंतवणुकदार आहेत.

सोन्याच्या खरेदी करताना सावधान?

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

gold rate falls In mumbai pune and maharastra major cities Know the Gold price today