Gold Rate in 2024 Maximum: सन 2024 ला आज गुडबाय करण्यात येणार आहे. तसेच 2025 चे स्वागत करण्यात येणार आहे. देशात आणि जगात 2024 मध्ये अनेक घडामोडी ठरल्या. गुंतवणूकदारांसाठी हे वर्ष लाभदायक ठरले. शेअर बाजारात उच्चांक झाला होता. तसेच सोने आणि चांदीने उच्चांक गाठला. देशात सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारासाठी यंदाचा वर्ष गोल्डन इयर ठरले.
2024 या वर्षात जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दराने विक्रमी उच्चांकी गाठला. गेल्या वर्षी 65 हजार रुपयांवर असलेले सोन्याचे भाव हे 2024 मध्ये 80 हजार रुपयांपर्यंत पोहोचले. चांदीने देखील या वर्षांमध्ये मोठी उसळी घेतली. चांदीचे दर एका लाखांच्या उंबरठयावर पोहोचले.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षात तब्बल सोन्याचे दर तब्बल 25 हजारांनी तर चांदीचे दर तीस हजार रुपयांनी वाढले. 2023 च्या तुलनेत 2024 या वर्षांमध्ये सोन्याने चांदीच्या भावात सतत चढ-उतार होत राहिला. सरफा बाजारात मोठी उलाढाल झाली. सोन्यात गुंतवणूक करणारा ग्राहकांना सुद्धा या वर्षेमध्ये तब्बल 22 टक्क्यांपर्यंतचा परतावा मिळाला. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी यंदाच वर्ष फायद्याचे ठरले.
सोन्याचे आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाल्यामुळे सुवर्णनगरीतील व्यवसायिकांसाठी सुद्धा हे वर्ष… ऐतिहासिक ठरल्याचे सुवर्ण व्यवसायिकांनी सांगितले. जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याने चांदीच्या दराने विक्रमी उच्चांकी गाठल्याचे सन 2024 मध्ये दिसून आले. यामुळे मोठी उलाढाल सोने बाजारात झाल्याचे दिसून आले.
हमास – इजराइल युद्ध, रशिया युक्रेन युद्ध यामुळे यंदा सोने अधिक चमकले. जगातील युद्धजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बँकांच्या व्याजदरातील चढ-उतार या सर्वांचा परिणाम सोने, चांदीच्या दरावर झाल्याचे सुवर्णव्यवसायिकांनी सांगितले. भारतीय महिलांना असलेल्या सोन्याची आवड, लग्न समारंभात करण्यात येणारे सोने यामुळेही सोन्याचे दर वाढले. 30 डिसेंबर रोजी दिल्लीत सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमला 78183 रुपये होते.