नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या नव्या अवताराची बातमी येताच यूएस फेडरल रिझर्व्हने टॅपरिंग कार्यक्रमाला गती दिल्याने शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. शेअर बाजारातील गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूकदारांकडे वळत आहेत, त्यामुळे आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली. आज सेन्सेक्समध्ये गेल्या सात महिन्यांतील सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यामुळे दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 570 रुपयांनी वाढून 47,155 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. त्यामुळे मागील व्यवहारात सोने 46,585 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. चांदीचा भावही 190 रुपयांनी वाढून 62,145 रुपये प्रति किलोवर बंद झाला. गेल्या सत्रात चांदीचा भाव 61,955 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.
विदेशी चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 37 पैशांनी 74.89 वर घसरला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव $1,808 प्रति औंस होता, तर चांदीचा भाव $23.70 प्रति औंसवर स्थिर होता.
HDFC सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, “शुक्रवारी COMEX (न्यूयॉर्क-आधारित कमोडिटी एक्सचेंज) वर स्पॉट गोल्ड एक टक्का वाढून $1,808 प्रति औंस झाले. त्यामुळे सोन्याचे भाव स्थिर राहिले.
आजच्या घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे सुमारे 7.5 लाख कोटी रुपये बुडाले. अनेक देशांमध्ये कोरोनाचे नवीन प्रकार आढळून आलेत, त्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना पुन्हा एकदा प्रभावित झाल्यात. दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि हाँगकाँगमध्ये नवीन अवतार सापडलाय. नवीन प्रकारांमुळे युरोपातील अनेक देशांमध्ये नवीन लॉकडाऊन लागू करण्यात आलेत.
संबंधित बातम्या
पोस्टाच्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केलीय का? कोणत्या सेवेसाठी किती फी?