नवी दिल्ली : बदलत्या घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या भावांमध्ये वारंवार चढ-उतार पाहायला मिळाला. पण आज बुधवारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किंमतींमध्ये घट झाल्याचं समोर आलं आहे. एमसीएक्सवर सकाळी 10.50 वाजता सोन्याचा वायदा भाव 157 रुपयांनी घसरला तर चांदीचा वायदा भाव 109 रुपयांनी वाढला आहे. यामुळे सोनं दर दहा ग्रॅम 46720 रुपयांवर तर एक किलो चांदीचा भाव 69465 रुपयांवर पोहोचला आहे. (gold rate today gold silver price in major cities and mcx on Wednesday)
आता सराफा बाजाराविषयी बोलायचं झालं तर काल सोन्याच्या किंमतींमध्ये 9 रुपयांची घसरण झाली होती तर चांदीच्या भावात 95 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. चांदी 95 रुपयांनी वाढून 69530 रुपयांवर होती. तर जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव किरकोळ वाढून 1821 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. यावेळी चांदीचा दर औंस 27.60 डॉलरवर स्थिरावल्याचं दिसून आलं.
बजेटनंतर सोन्याच्या किंमतींवर परिणाम
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्याच्या भावात (Gold Rate) चढउतार पाहायला मिळत आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत आहे, दुसरीकडे लसीकरणाच्या बातम्यांमुळे भारतातील सोन्या-चांदीवरही परिणाम होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाऊननंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून, गुंतवणूकदारही सोन्याकडून शेअर बाजाराकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याचे भावही मोठ्या प्रमाणात घसरत आहेत.
दर वाढले तरी सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही
सोने खरेदीला भारतामध्ये मोठा वाव आहे. सोन्याचा दर 50 हजारांच्या वरपर्यंत गेला होता. पण भारतीयांची सोने खरेदीबाबत एक मानसिकता आहे. त्यामुळे सोन्याचा दर 70 हजारांवर गेला तरी लोक सोनं खरेदी करतील. त्यामुळे त्याचा सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही. लोकं सोनं खरेदी करणं बंद करणार नाहीत”, असंही काही जाणकारांचं मत आहे.
सोने प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता
देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. (gold rate today gold silver price in major cities and mcx on wednesday)
संबंधित बातम्या –
BI देतेय महिन्याला 10000 रुपये कमावण्याची संधी, वाचा काय आहे नेमकी योजना?
Amazon, Flipkart वरून रोज कमावा 5,000 रुपये, धमाकेदार आहे ऑफर
फ्लाईट बुकिंवर मिळवा थेट 1200 रुपयांची सूट, ICICI बँकेने शेअर केला ‘Promo Code’
(gold rate today gold silver price in major cities and mcx on wednesday)