एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर 225 रुपयांनी घसरून 50,761 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. याआधी सोनं (Gold Today) 50,986 रुपये प्रति 10 ग्रॅमवर (दिल्लीत सोन्याची किंमत) क्लोज झालं होतं. चांदीही 315 रुपयांनी कमी होऊन 54,009 रुपये प्रति किलो झाली आहे. चांदीचा याआधीचा क्लोजिंग रेट (Closing Rate) 54,324 रुपये प्रति किलो होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव आज 1,702 डॉलर प्रति औंस, तर चांदीचा भाव (Silver Rate Today) 18.18 डॉलर प्रति औंसवर स्थिर होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून झपाट्याने झालेली व्याजदर वाढ आणि अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीचा हा परिणाम आहे.
बुधवारी वायदा व्यापारात सोन्याचे दर 35 रुपयांनी घसरून 50,246 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचे करार 35 रुपये किंवा 0.07 टक्क्यांनी कमी होऊन 1,077 लॉटच्या व्यावसायिक उलाढालीत 50,246 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.
यात 11,412 लॉटचा व्यापार झाला. जागतिक स्तरावर, न्यूयॉर्कमध्ये सोने 0.12 टक्क्यांनी घसरून 1,710.80 डॉलर प्रति औंसवर होते.
बुधवारी चांदीचे दर 283 रुपयांनी वाढून 53,429 रुपये प्रति किलो झाले.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये, डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचे करार 283 रुपये किंवा 0.53 टक्क्यांनी वाढून 1,075 लॉटच्या व्यावसायिक उलाढालीत 53,429 रुपये प्रति किलोवर पोहोचले. 27,502 लॉटचे सौदे झाले.