Gold Price Today मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (MCX) सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात (Gold Rates) 342 रुपयांची घसरण होऊन प्रतितोळा भाव 48058 रुपये इतका झाला आहे. या आठवड्यात ऑगस्ट महिन्यातील डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव दहा ग्रॅम 342 रुपयांनी घसरून 48058 रुपये झाला.
गेल्या आठवड्यात, ऑगस्ट महिन्यातील वितरणासाठी सोन्याचा बंद भाव प्रति दहा ग्रॅम 47923 रुपये होता. तर साप्ताहिक आधारावर यात 135 रुपयांची वाढ नोंदवली गेली. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा दर 16.40 डॉलरने (-0.90%) घसरण झाली असून ते प्रति औंस 1,812.60 इतका झाला आहे.
चांदीची किंमत काय?
तर देशांतर्गत बाजारात चांदीच्या किंमतीत फार परिणाम झाला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (MCX) चांदीच्या भावात 1336 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीची किंमत 68345 प्रतिकिलो झाली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आठवड्याच्या शेवटच्या चांदीचा दर 0.687 डॉलरने (-2.60%) घसरण झाली असून ते प्रति औंस 1.67 इतका झाला आहे.
जागतिक बाजारपेठेतील मौल्यवान धातूंच्या घसरणीत शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 73 रुपयांनी घसरून 47,319 रुपयांवर आला. तसेच चांदीही 196 रुपयांनी घसरून 68,043 रुपये प्रतिकिलो झाला आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (आयबीजेए) वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 48273 रुपये इतका झाला आहे. तर चांदीची किंमत प्रति किलो 68912 रुपये होती.
लोकलमध्ये महिला प्रवाशांचे मोबाईल चोरणारी सराईत महिला चोर जेरबंदhttps://t.co/8h6CP3R5jv#Local #MobileThief #NaviMumbaiCrime
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 17, 2021
(
संबंधित बातम्या :
SBI चा कोट्यावधी ग्राहकांना सतर्कतेचा इशारा, 10 हजार रुपये दंड टाळायचा असेल तर आजच करा ‘हे’ काम
रेकॉर्ड ब्रेक: देशाची तिजोरी भरली, परकीय चलन साठा 611 अब्ज डॉलर्सच्या पुढे
देशातील सर्वात मोठ्या सिगारेट कंपनीच्या बॉसच्या पगारात 47 टक्के वाढ, आता दररोज एवढे लाख मिळणार