नवी दिल्लीः सोने आणि चांदीच्या (Gold Silver latest price) आठवड्याच्या अखेरच्या दिवसात डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाढ आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीतील सुस्ती यामुळे अखेरच्या दिवसात मोठी घसरण नोंदली गेली. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात 451 रुपयांची घसरण झाली आणि आज त्याचा बंद भाव प्रति दहा ग्रॅम 46,844 रुपये झाला. गुरुवारी त्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 47,295 रुपये होती. (Gold Silver Price Today: Big Fall In Gold And Silver On The Last Day Of The Week 09 July 2021)
चांदीच्या दरामध्ये आज 559 रुपयांची (Silver latest price)घसरण झाली, त्यानंतर त्याचा बंद भाव 67,465 रुपये प्रति किलो झाला. गुरुवारी त्याची किंमत 68,024 रुपये प्रति किलो होती. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 7 पैशांनी वधारला आणि 74.64 वर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1802 डॉलरच्या पातळीवर आहे. चांदी सध्या 0.50 टक्क्यांच्या वाढीसह प्रति औंस 26.11 डॉलरच्या पातळीवर व्यापार करीत आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे ज्येष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, अमेरिकन बाँडच्या उत्पन्नात घट झाल्याने सोन्याच्या किमतीत वाढ झाली. सलग तिसऱ्या आठवड्यात सोन्याची किंमत वाढली. साप्ताहिकदृष्ट्या यावेळी सोन्यात जवळपास 1 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.
अमेरिकेच्या 10 वर्षांच्या रोखे उत्पन्नात आज मोठी वाढ झाली. सध्या ते 4.51 टक्क्यांच्या वाढीसह 1.346 टक्क्यांच्या पातळीवर आहे. गेल्या तीन दिवसांपासून यील्ड बाँडवर जोरदार दबाव दिसून येत होता. डॉलर निर्देशांक 0.15 टक्क्यांनी घसरून 92.263 च्या स्तरावर आहे. जगातील सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर किती मजबूत आहे हे या निर्देशांकातून दिसून येते.
संबंधित बातम्या
आपल्याजवळ असलेले पॅन कार्ड खरे आहे की बनावट, काही मिनिटांत शोधून काढा
Gold Silver Price Today: Big Fall In Gold And Silver On The Last Day Of The Week 09 July 2021