नवी दिल्ली: Gold Silver Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या किमती (Gold latest price) देखील वाढताना दिसत आहेत. एमसीएक्सला सकाळी 10.40 वाजता ऑगस्टमध्ये डिलिव्हरीसाठीचे सोन्याचे भाव 287 रुपयांच्या वाढीसह 47864 रुपयांवर होते. त्याचप्रमाणे ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोने 256 रुपयांनी वाढून 47970 रुपयांवर आणि डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोने 353 रुपयांनी वाढून 48283 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर प्रति औंस 1,815.10 च्या पातळीवर होते. त्यात 15.40 डॉलरची (+0.86%) तेजी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या किमतीही वाढताना दिसत आहेत. यावेळी चांदी 0.431 (+ 1.73%) च्या तेजीसह 25.308 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर व्यापार करीत होती. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये (Gold Silver latest price) बुधवारी सोने 61 रुपयांनी किरकोळ घटून 46,607 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. चांदीदेखील 1,094 रुपयांनी घसरून 64,779 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली.
यावेळी एमसीएक्स चांदीच्या डिलिव्हरीमध्ये (Silver price today) देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावेळी सप्टेंबर डिलिव्हरीसाठी चांदी 891 रुपयांच्या वाढीसह 67281 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती. त्याचप्रमाणे चांदीचा भाव डिलिव्हरीसाठी 960 रुपयांनी वाढून 68114 रुपये प्रतिकिलोवर होता.
इंटरबँक फॉरेन एक्सचेंजच्या सुरुवातीच्या व्यापारात रुपया डॉलरच्या तुलनेत आज वाढत आहे. 13 पैशांच्या बळावर रुपया 74.25 च्या पातळीवर होता. डॉलर निर्देशांक यावेळी कमकुवतपणा दाखवत आहे. -0.20% च्या घसरणीसह ते 92.132 च्या पातळीवर होते. जगातील सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर किती मजबूत आहे हे या निर्देशांकातून दिसून येते. दहा वर्षांच्या अमेरिकन बाँडचे उत्पन्नही -1.88% टक्क्यांनी घटून ते 1.239 टक्के होते. कच्च्या तेलामध्ये आज वाढ दिसून येत आहे आणि ते + 0.51% च्या सामर्थ्याने 74.25 च्या पातळीवर आहे.
सोन्याची अनिवार्य हॉलमार्किंग प्रक्रिया 16 जूनपासून टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. तेव्हापासून ज्वेलर्स, सराफा व्यापाऱ्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. अखिल भारतीय रत्न आणि ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (जीजेसी) बुधवारी सांगितले की, सराफा केंद्रांकडून हॉलमार्क केलेले दागिने मिळण्यास उशीर आणि वस्तूंवर आयडी प्रणालीची अंमलबजावणी यासह सोन्याचे वस्तू खराब होण्यासारख्या समस्या सराफा व्यापाऱ्यांना येत आहेत. 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 256 जिल्हे सोन्याच्या हॉलमार्किंगच्या पहिल्या टप्प्यात निवड झाली. सोन्याचे हॉलमार्किंग मौल्यवान धातूच्या शुद्धतेचा पुरावा आहे. आतापर्यंत ते ऐच्छिक होते.
संबंधित बातम्या
TDS दाव्याबाबत महत्त्वाची बातमी; बँकेकडे आपले हे कागदपत्र नसल्यास परतावा मिळण्यात अडचण
पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा 6.31 लाखांचा फायदा
Gold Silver Price Today: Gold-Silver surges today, price rises to around Rs 1000, check it out