नवी दिल्लीः Gold Silver Price Today: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत बुधवारी सोन्याचा भाव 137 रुपयांनी वाढून 47,311 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, रुपयाची घसरण हे त्याचे प्रमुख कारण आहे. मागील व्यवहारात मौल्यवान धातू 47,174 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. मात्र चांदीचा भाव 160 रुपयांनी घसरून 63,482 रुपये प्रतिकिलो झाला. मागील व्यवहारात चांदीचा भाव 63,642 रुपये प्रति किलो होता. बुधवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 32 पैशांनी घसरून 74.37 वर आला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,827 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव 24.30 डॉलर प्रति औंस होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, कॉमेक्स ट्रेडिंगवर स्पॉट गोल्डच्या किमतीसह सोन्याच्या किमती कमजोरीने व्यवहार करत होत्या. ते पुढे म्हणाले की, मजबूत डॉलर आणि यूएस बाँड उत्पन्नात वाढ झाल्याने सोन्याच्या किमती दबावाखाली व्यवहार करत आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सोन्याचा दर 48,120 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर चांदी 64,692 रुपये प्रति किलोवर उपलब्ध आहे. त्याचवेळी कोलकात्यात सोन्याचा भाव 49,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर पश्चिम बंगालच्या राजधानीत चांदी 65,000 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केली जाऊ शकते.
वायदा व्यवहारात बुधवारी सोन्याचा भाव 32 रुपयांनी घसरून 48,255 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 32 रुपयांनी किंवा 0.07 टक्क्यांनी कमी होऊन 7,685 लॉटच्या व्यवसायासाठी 48,255 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करीत आहे. दुसरीकडे बुधवारी वायदे व्यवहारात चांदीचा भाव 215 रुपयांनी वाढून 64,785 रुपये प्रति किलो झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 215 रुपयांनी किंवा 0.33 टक्क्यांनी वाढून 64,785 रुपये प्रतिकिलोवर 2,188 लॉटसाठी व्यवहार झाला.
सध्या सोने खरेदीचा हंगाम सुरू आहे. तुम्हीही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींचा अवश्य विचार करा. सर्वप्रथम तुम्ही जे दागिने किंवा सोन्याचे उत्पादन घेत आहात, त्यावरील हॉलमार्किंग नक्कीच तपासा. ही पहिली पायरी आहे जी तुमची खरेदी योग्य असल्याची खात्री करते आणि तुम्ही योग्य ठिकाणी पैसे देत आहात.
संबंधित बातम्या
रेल्वे तिकीट रद्द करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, किती शुल्क कापले जाणार?
किरकोळ गुंतवणूकदारांना गिफ्ट, 12 नोव्हेंबरला पीएम मोदी ‘या’ योजनेचा करणार शुभारंभ