नवी दिल्ली : Gold Price Today : गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरांमध्ये वारंवार चढ-उतार झाल्याचं दिसून आलं. अशात आता सोन्याचे दर पडताना दिसत आहे. गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर सोन्याच्या भावात घसरण दिसून आली. गेल्या दोन महिन्यांतच सोनं 3,000 रुपयांहून अधिक स्वस्त झाले आहे. यावेळी, ऑगस्ट 2020 च्या विक्रमी उच्च पातळीशी तुलना केल्यास सोन्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त घसरण झाली आहे. (gold silver price today update march 01 2021 gold prices today gold silver)
गुरुवारी दिल्लीमध्ये सराफा बाजारात सोन्याच्या किंमती 358 रुपयांनी घसरून 45,959 रुपयांवर आल्या. एचडीएफसी सिक्युरिटीजकडून ही माहिती दिली आहे. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 46,313 रुपयांवर बंद झाले. सोमवारी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48,910 वर पोहोचली आहे तर चांदीची किंमत 68,200 वर पोहोचली आहे.
दुसरीकडे, चांदीचा भाव 151 रुपयांनी वाढून 69,159 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला, तर मागील बंद भाव प्रतिकिलो 69,008 रुपये होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल म्हणाले, “जागतिक स्तरावर सोन्याच्या विक्रीनुसार दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याचे स्पॉट किंमत 358 रुपयांनी घसरली आहे.” आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1,792 डॉलर आणि चांदी किंचित खाली 27.56 डॉलर प्रति औंसवर बंद झाली. (gold silver price today update march 01 2021 gold prices today gold silver)
संबंधित बातम्या –
आनंदाची बातमी: ऐन लग्नसराईच्या मोसमात जळगावात सोने-चांदी स्वस्त
SBI मध्ये घर बसल्या 500 रुपयांनी स्वस्त खरेदी करा सोनं, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
सरकार वाटणार 1 कोटी मोफत LPG Connection, लवकरच सिलेंडरही होणार स्वस्त
(gold silver price today update march 01 2021 gold prices today gold silver)