नवी दिल्ली | 16 डिसेंबर 2023 : सोने-चांदीच्या किंमती पुन्हा वधारल्या. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीत घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. लग्नसराईत सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी सराफा पेठांकडे धाव घेतली. गुरुवारी सोने-चांदीने अचानक युटर्न घेतला. सोन्याच्या भावात थेट एक हजार तर चांदीत अडीच हजार रुपयांची वाढ झाली. दिवाळीपासून सोने-चांदीने आगेकूच सुरु ठेवली. या महिन्याच्या सुरुवातीला या दरवाढीला मोठा ब्रेक लागला. या आठवड्यात पण तीन दिवस भावात मोठी घसरण झाली. गुरुवारपासून मौल्यवान धातूच्या किंमतीत जोरदार उसळी आली. काही दिवसांत सोने पुन्हा रेकॉर्ड करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे आहेत सोने-चांदीचे भाव (Gold Silver Price Today 16 December 2023)
सोन्याची मुसंडी
या आठवड्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत सोने 550 रुपयांनी स्वस्त झाले होते. सोमवारी, 11 आणि 12 डिसेंबर रोजी सोने प्रत्येकी 220 रुपये, बुधवारी 13 डिसेंबर रोजी 100 रुपयांनी उतरले. 14 डिसेंबर रोजी सोन्यात 1 हजार रुपयांची वाढ झाली. 15 डिसेंबर रोजी सोने 100 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी 3500 रुपयांनी सूसाट
आठवड्याच्या सुरुवातीला चांदी हजार रुपयांनी स्वस्त झाली होती. गुरुवारी चांदीने 2500 रुपयांची उसळी घेतली. 15 डिसेंबर रोजी चांदीत एक हजारांची वाढ झाली. या दोन दिवसांच्या दरवाढीमुळे चांदीची किंमत 3500 रुपयांनी वाढली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,367 रुपये, 23 कॅरेट 62,117 रुपये, 22 कॅरेट सोने 57,128 रुपये झाले. 18 कॅरेट 46,775 रुपये, 14 कॅरेट सोने 36,485 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,273 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.