Gold Silver Rate Today : सोन्याला झळाळी, चांदीत नरमाई, लेटेस्ट भाव तरी काय

| Updated on: Sep 21, 2023 | 10:54 AM

Gold Silver Rate Today : अमेरिकन केंद्रीय बँकेच्या धोरणाचा अखेर परिणाम दिसून आला. फेडरल रिझर्व्हने व्याजदर निश्चित केले. त्याला सोने-चांदीने तात्काळ प्रतिक्रिया दिली. दोन्ही धातूंमध्ये घसरण दिसून आली. काय झाला बदल, किती आहे सोने-चांदीचा भाव, घ्या जाणून

Gold Silver Rate Today : सोन्याला झळाळी, चांदीत नरमाई, लेटेस्ट भाव तरी काय
Follow us on

नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : अमेरिकन केंद्रीय बँकेने सर्वांनाच धक्का दिला. महागाई आटोक्यात आणण्यासाठी गेल्या वर्षभरापासून फेडरल रिझर्व्हने आक्रमक धोरण अवलंबले आहे. पण भारतीय रिझर्व्ह बँकेचा कित्ता यावेळी फेडरलने गिरवला. आरबीआयने तीनदा व्याजदर जैसे थे ठेवण्याचा विक्रम केला आहे. फेडरल रिझर्व्हने हेच धोरण राबविले. केंद्रीय बँकेने व्याजदरात कोणतीही वाढ केली नाही. या घडामोडींचा परिणाम तात्काळी सोने-चांदीच्या किंमतींवर दिसून आला. सोने-चांदीने (Gold Silver Price Today 21 September 2023) गेल्या पाच दिवसांपासून सुरु केलेल्या चढाईला ब्रेक लागला. जागतिक बाजारात सोने-चांदीत नरमाई आली.

सोने-चांदीची चढाई

जागतिक बाजारात सोने-चांदीत नरमाई आली. भारतीय बाजारात सोन्याला झळाळी आली आहे. तर चांदीने नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. पाच दिवसांत 700 रुपयांची तर चांदीत 1000 रुपयांची दरवाढ झाली. आता ब्रेक लागल्याने या किंमती इतक्या खाली आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

सोन्याने घेतला ब्रेक

गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्यात सुरुवातीच्या सत्रात जागतिक घडामोडींमुळे सोन्याला उसळी घेता आली नाही. 15 सप्टेंबरला सोन्याने पहिल्यांदा चढाई केली. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी सोन्यात प्रत्येकी 200 रुपयांची वाढ झाली. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी सोने 150 रुपयांनी वधारले. 19 सप्टेंबर रोजी 150 रुपयांनी दर वधारले. 20 सप्टेंबर रोजी सोन्याला कामगिरी बजावता आली नाही. या पाच दिवसांत 700 रुपयांची दरवाढ झाली. 22 कॅरेट सोने 55350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,370 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.

चांदीत नरमाई

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच चांदीत 5000 रुपयांची पडझड झाली. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी चांदीची किंमत 1200 रुपयांनी वाढली. तर 18 सप्टेंबर रोजी चांदी 200 रुपयांनी स्वस्त झाली. 19 सप्टेंबर रोजी चांदीने 300 रुपयांची दरवाढ नोंदवली. 20 सप्टेंबर रोजी 300 रुपयांनी किंमती घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 74,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोने 59,317 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 59,079 रुपये, 22 कॅरेट सोने 54334 रुपये, 18 कॅरेट 44,488 रुपये, 14 कॅरेट सोने 34,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,204 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.