नवी दिल्ली | 31 ऑक्टोबर 2023 : ऑक्टोबर महिन्यात खऱ्या अर्थाने सोने-चांदीला चकाकी आली. किंमतींनी तडक उडी घेतली. भावात मोठी वाढ झाली. सोने आणि चांदी 4 हजारांनी महागले. त्यामुळे दसऱ्यात सोने-चांदी खरेदीच्या ग्राहकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. जागतिक मंचावर सध्या दोन युद्ध सुरु आहेत. युरोप आणि अमेरिकेच्या मंदीखाली आहे. शेजारील चीन गंटागळ्या खात आहेत. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या गतीला ब्रेक लागला आहे. युद्धामुळे अनेक देशांनी सोने-चांदीची (Gold Silver Price Today 31 October 2023) मागणी वाढवली आहे. त्याचे पडसाद भारतीय सराफा बाजारात पण दिसून आले. या आठवड्याच्या सुरुवातीला आणि या महिन्याच्या अंतिम टप्यात सोने स्वस्त झाले तर चांदी महागली आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये मौल्यवान धातूंची काय चाल असेल याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
अचानक सोन्याची माघार
गुडरिटर्न्सनुसार, गेल्या आठवड्याची सुरुवात पण घसरणीनेच झाली होती. 23 ऑक्टोबरला किंमती 300 रुपयांनी सोने स्वस्त झाले होते. 28 ऑक्टोबर रोजी किंमती 600 रुपयांची वाढल्याने सोने एक हजारांनी वधारले होते. 30 ऑक्टोबर रोजी सोन्यात 230 रुपयांची घसरण झाली आहे. आता 22 कॅरेट सोने 57,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी वधारली
गेल्या आठवड्यात चांदीत नरमाई होती. किंमतीत सातत्याने घसरण सुरु होती. गेल्या आठवड्यात चांदीत 1200 रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळे महिन्याच्या शेवटी पण चांदीत घसरणीचा अंदाज वर्तविण्यात येत होता. तो सपशेल चुकला. चांदीने 1 हजारांची उसळी घेतली. 30 ऑक्टोबर रोजी ही भाव वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,600 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,238 रुपये, 23 कॅरेट 60,993 रुपये, 22 कॅरेट सोने 56,094 रुपये झाले. 18 कॅरेट 45,928 रुपये, 14 कॅरेट सोने 35,824 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीत वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव 71,931 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. तज्ज्ञांच्या मते, इस्त्राईल-हमाय युद्ध आणि दिवाळीत मागणी वाढल्याने सोने-चांदीत मोठी घसरण येणार नाही.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.