नवी दिल्लीः Gold Silver Rate Today : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी सोन्याचा भाव 112 रुपयांनी वाढून 47,050 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील मौल्यवान धातूंच्या किमतीत झालेल्या रिकव्हरीमुळे हे घडलेत. मागील व्यवहारात मौल्यवान धातू 46,938 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. याउलट चांदीचा भाव 203 रुपयांनी घसरून 63,767 रुपये प्रति किलो झाला. मागील व्यवहार दिवसात तो 63,970 रुपये प्रति किलो होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,803 डॉलर प्रति औंस आणि चांदी 24.12 डॉलर प्रति औंस या पातळीवर व्यवहार करत होती.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, यूएस बॉण्डचे कमी उत्पन्न आणि मिश्र जागतिक संकेतांमुळे सोन्याच्या किमती पूर्वीच्या तोट्यातून सावरल्यात. त्याचबरोबर कोलकात्यात चांदीचा भाव 65,000 रुपये प्रति किलो झाला. सोन्याबद्दल बोलायचे झाल्यास पश्चिम बंगालच्या राजधानीत सोन्याचा भाव 48,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. वायदे व्यवहारात गुरुवारी सोन्याचा भाव 18 रुपयांनी वाढून 47,980 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबरसाठी सोन्याचा भाव 18 रुपयांनी वाढून 47,980 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गुरुवारी चांदीचा भाव 109 रुपयांनी घसरून 65,056 रुपये प्रतिकिलो झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबरसाठी चांदीचा भाव 109 रुपयांनी घसरून 65,056 रुपये प्रतिकिलो झाला.
जुलै-सप्टेंबर या तिमाहीत भारतातील सोन्याच्या मागणीत वार्षिक 47 टक्क्यांनी वाढ झाली. जागतिक सुवर्ण परिषदेने एका अहवालात म्हटले आहे की, आर्थिक हालचाली वाढल्यामुळे आणि ग्राहकांच्या मागणीतील पुनर्प्राप्तीमुळे हे घडलेत. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) च्या मते, भारतातील सोन्याची मागणी कोविडपूर्वीच्या पातळीवर परत येतेय आणि पुढे जाण्याचा दृष्टिकोन अधिक चांगला दिसत आहे. 2020 च्या सप्टेंबर तिमाहीत देशाची एकूण मागणी 94.6 टन होती. हे WGC च्या Q3 गोल्ड मागणी अहवालात नमूद केलेय. अहवालानुसार, मूल्याच्या बाबतीत भारताची तिसऱ्या तिमाहीतील मागणी 37 टक्क्यांनी वाढून 59,330 कोटी रुपये झाली आहे. एका वर्षापूर्वी ते 43,160 कोटी रुपये होते.
संबंधित बातम्या
ICICI बँकेचं भारतीय लष्करातील जवानांसाठी विशेष खाते, थेट 50 लाखांचा अपघात विमा मिळणार
दिवाळी ऑफर! IRCTC Air वरून फ्लाइटचे तिकीट बुक करा आणि मिळवा अनेक फायदे!