नवी दिल्ली : सोन्याला अखेर अच्छे दिन आले. मे आणि जूनमधली मरगळ एका झटक्यात फेकून दिली. सोने आणि चांदीने जोरदार मुसंडी मारली. मे आणि जून महिन्यात दोन्ही धातूंच्या किंमती घसरल्या होत्या. सोने तर 58000 रुपयांपर्यंत खाली घसरले होते. तर चांदीने 70,000 रुपयांची सपोर्ट लेव्हलपेक्षा कमी दर गाठला होता. त्यावेळी सराफा बाजारात खरेदीदारांनी गर्दी केली होती. गुंतवणूकदारांनी भविष्यात किंमती वधारण्याचा अंदाज घेत, गुंतवणूक केली. त्यांच्या चाणाक्षपणाचा आता फायदा होईल. अमेरिकन डॉलर तोंडावर आपटल्याबरोबरच जागतिक बाजारात सोने-चांदीने (Gold Silver Price Today) पुन्हा भरारी घेतली. दोन्ही धातूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली. या घडामोडींचा बाजारात लागलीच परिणाम दिसला. सराफा बाजारात दरवाढीने चैतन्य संचारले. तर खरेदीदारांना घाम फुटला.
एप्रिलनंतरची मोठी उसळी
शुक्रवारच्या सत्रात 14 जुलै रोजी जागतिक बाजारात सोन्याने जोरदार मुसंडी मारली. एप्रिल महिन्यानंतरची ही मोठी दरवाढ असल्याचा दावा करण्यात येत आहे. स्पॉट गोल्ड सध्या 1,958.345 प्रति औंस डॉलरवर आहे. तर अमेरिकन फ्युचर गोल्डचा सध्याचा भाव 1,963 प्रति औंस डॉलर आहे.
डॉलर आपटला
महागाईच्या आकड्यांचा मोठा परिणाम डॉलरवर दिसून आला. डॉलर दणकावून आपटला. गेल्या वर्षभराच्या निच्चांकावर डॉलर पोहचला. एप्रिल 2022 नंतर डॉलर निच्चांकावर आल्याचे बाजारातील घडामोडींवरुन दिसून येत आहे. आता अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेनंतर डॉलरला किती बळ मिळते हे समोर येईल.
सोने-चांदीची उसळी
जुलै महिन्यात खऱ्या अर्थाने सोने उजळले आहे. मे आणि जून महिन्यातील मरगळ सोन्याने झटकून टाकली. सोने 1300 रुपयांनी वधारले. तर चांदीने जोरदार मुसंडी मारली. चांदीने जवळपास 5 हजार रुपयांची उसळी घेतली. यामुळे गुंतवणूकदार मालदार झाले आहेत.
या महिन्यात भरारी
14 जुलै रोजीचे दर अपडेट झालेले नाही. 13 जुलै रोजी सोन्यात 350 रुपयांची वृद्धी झाली. 12 जुलै रोजी, सोने 200 रुपयांनी वधारले होते. 8 जुलै रोजी सोने थेट 400 रुपयांनी वाढले. 4 जुलै आणि 6 जुलै रोजी सोन्यात प्रत्येकी 100 रुपयांची दरवाढ झाली होती. 1 जुलै रोजी सोन्यात 220 रुपयांची वृद्धी दिसून आली होती. गुडरिटर्न्सनुसार, या महिन्यात 3, 7, आणि 10 जुलै रोजी सोन्यात प्रत्येकी 100 रुपयांची घसरण झाली.13 जुलै रोजी, 22 कॅरेट सोने 55,150 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव