नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सतत सोन्याच्या किंमती घसरत होत्या. पण आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सोन्याचा भाव वाढला आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आज सुरुवाती व्यवहारात एमसीएक्सवर डिसेंबरच्या सोन्याचा वायदा भाव 0.27 टक्क्यांनी वधारत 51,047 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे तर चांदीचा वायदा भाव 0.6 टक्क्यांनी वधारत 63,505 रुपये प्रति किलोग्रॅवर पोहोचला आहे. (gold sliver price gold rate hike today on 21 october 2020 know the rates here)
मागच्या सत्रामध्ये सोन्याने 0.45 टक्क्यांनी वाढलं होतं तर चांदीने 1.6 टक्क्यांनी वधारली होती. अमेरिकन उत्तेजन पॅकेजच्या अपेक्षेमुळे परदेशी बाजारपेठेत सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या आठवड्यामध्ये उत्तेजन पॅकेज जाहीर करणार असल्याचे संकेत दिल्याने सोन्याच्या भावांमध्ये वाढ झाली आहे.
तुमच्याकडे आहे ही 10 रुपयांची नोट तर लगेच मिळतील 25 हजार, वाचा कसे?
विदेशी बाजारात सोनं 0.3 टक्क्यांनी वाढून 1,912.11 डॉलर प्रति औंसवर गेलं आहे तर चांदी 0.7 टक्क्यांनी वाढून 24.82 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. इतर मौल्यवान धातूंचे भावही वधारले आहेत. प्लेटिनम 0.3 टक्क्यांनी वाढत 873.89 डॉलरवर गेलं आहे.
खरंतर, जेव्हा अर्थव्यवस्था कमकुवत होते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात आणि जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असते तेव्हा सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण होते. तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंमती आणखी घसरू शकतात. पण दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमती मोठ्या झपाट्याने वाढतील. दिवाळीपर्यंत सोनं 50000-52000 रुपये प्रति 10 ग्रॅम होण्याची शक्यता आहे. (gold sliver price gold rate hike today on 21 october 2020 know the rates here)
पुराचा असा प्रकोप कधीच पाहिला नसेल, दीड मिनिटांचा हा CCTV काळजाचा ठोका चुकवेल
दिवाळीपर्यंत सोनं 65 हजारी, चांदीचा भावही 70 हजार पार
सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विमल गोयल याबाबत म्हणाले की, दिवाळीपर्यंत सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत तब्बल 65 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते, तर चांदीचा दर प्रति किलो 70-75 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
VIDEO | आजी-माजी मुख्यमंत्री आज मराठवाडा दौऱ्यावर, सोलापूर विमामतळावरुन थेटhttps://t.co/FuQGcegvph@Dev_Fadnavis @OfficeofUT @CMOMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
(gold sliver price gold rate hike today on 21 october 2020 know the rates here)