मुंबई : Gold Import Duty सोन्याच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे. सोन्यावरील आयात शुल्कामध्ये कपात करण्याचा प्रस्ताव वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने सादर करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सोन्यावर 7.5 टक्के आयात शुल्क आकारले जाते. त्यामध्ये घट करून ते 4 टक्क्यांपर्यंत कमी करावे असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सोन्यावरील आयात शुल्क कमी केल्यास सोन्याचे दर थेट 3.5 टक्क्यांनी कमी होणार आहेत. तसेच सरकारने जर वाणिज्य मंत्रालयाचा प्रस्ताव स्वीकारून सोन्याच्या आयात शुल्कात घट केली तर सोन्याच्या तस्करीला देखील मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान यापूर्वी देखील सरकारकडून सोने-चांदीच्या आयात शुल्कामध्ये कपात करण्यात आली होत. पूर्वी सोने-चांदी सारख्या मौल्यवान धातुंवर 12.5 टक्के आयात शुल्क आकारले जात होते. त्यानंतर त्यामध्ये कपात करण्यात आली. सध्या सोन्यावर 7.5 टक्के एवढे आयात शुल्क आकारले जात आहेत. आता त्यामध्ये देखील घट करण्याचा प्रस्ताव वाणिज्य मंत्रालयाने सरकारकडे पाठवला आहे. वाणिज्य मंत्रालयाचा प्रस्ताव स्वीकारला गेल्यास सोने 3.5 टक्क्यांनी स्वस्त होऊ शकते.
भारतामध्ये मोठ्याप्रमाणात सोन्याची आयात केली जाते, सोन्यावर आयात शुल्क जास्त असल्याने सोने तस्करीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाचा महसूल देखील मोठ्या प्रमाणात बुडत आहे. सोन्याच्या आयात शुल्कात कपात केल्यास काही प्रमाणात तस्करीच्या घटना कमी होतील असा अंदाज वाणिज्य मंत्रालयाने व्यक्त केला आहे. तसेच गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत लग्नकार्याचा हंगाम असल्याने सोन्याच्या मागणीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोन्याचे दर कमी झाल्याचा फायदा हा सामान्य ग्राहकांना देखील होऊ शकतो.
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 700 अकांची घसरण, गुंतवणूकदारांना मोठा फटका
CBDC | आता भारताची स्वतःची डिजिटल करन्सी, CBDC चं रुपडं लवकरच लाँच होणार
HDFC लाईफची निवृत्ती योजना, पॉलिसीच्या सुरुवातीलाच वार्षिक व्याज करा लॉक, इतरही अनेक फायदे